१२ गाव गटाची एकजूट! आडगाव राजा येथे ७ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक पौर्णिमा आणि ‘धम्म ग्रंथ सांगता’ सोहळ्याची जय्यत तयारी!

IMG-20251005-WA0021

ताड शिवणी (ब्रम्हानंद वाकोडे )बौद्ध धम्माचा गजर, संघाची भव्य एकजूट, आणि ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाच्या वाचनाची सांगता – या त्रिसंधीचा साक्षीदार ठरणार आहे आडगाव राजा! येत्या ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव राजा येथे भव्य १२ गाव गट पौर्णिमा आणि धम्म ग्रंथ सांगता सोहळा अतिशय श्रद्धा, उत्साह आणि चळवळीच्या जाज्वल्य भावना घेऊन पार पडणार आहे.

आडगाव राजा येथे गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पवित्र ग्रंथाचे वाचन सातत्याने केले जाते. ही परंपरा केवळ वाचनापुरती मर्यादित नसून, ती धम्माचा प्रचार, प्रबोधन आणि नवसंघटनाचे कार्य सतत करत राहते. यावर्षीच्या ग्रंथ वाचनाचा सांगता सोहळा ही एक मोठी धम्म चळवळ व सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

विशेष म्हणजे, याच काळात १२ गावांतील धम्म उपासक व उपासिकांची एक भव्य बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ७ ऑक्टोबर रोजी एकत्रित गट पौर्णिमा सोहळा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यावर्षीचा सोहळा हा ‘सांघिक ऐक्याचा दीपस्तंभ’ ठरणार आहे!

या दिवशी पूज्य भन्ते गुनरत्न महाथेरो आणि भन्ते चांद्रमणी हे मार्गदर्शन करणार असून, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उपस्थित राहणाऱ्या धम्म अनुयायांनी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात सहभागी व्हावे, आणि धम्मप्रसाराच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आडगाव राजा आणि १२ गाव गटातील धम्म उपासक व उपासिकांनी केले आहे.

चौकट

आडगाव राजा येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन अरुण कहाळे, व सुरेन्द्र कहाळे
हे करीत असून आडगाव राजा येथे असंख्य श्रामनेर असून या गावात धम्म चळवळ वाढीस लागावी यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे सातत्य धम्म उपासक व उपासीका करत आहेत
धम्म ही केवळ श्रद्धा नाही, ती क्रांती आहे! ७ ऑक्टोबर – धम्माचा आवाज, एकजुटीचा प्रकाश!

You may have missed

error: Content is protected !!