सर्व जातीय धर्मीय वधू वर परिचय मेळावा व पुरस्कार वितरण कार्यक्रम बुलढाण्यात संपन्न….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण 25 पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. बुलढाण्यामध्ये प्रमुख व आम्रपालीपी अवसरमोल यांना राज्यस्तरीय रणरागिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर डॉक्टर मंजुराजे जाधव यांना उत्कृष्ट कवी बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे डॉक्टर गजेंद्र निकम यांच्या कन्या यांना योगा विषयी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान करण्यात आले. गणेश कदम यांना उत्कृष्ट कलावंत यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे यामध्ये जास्तीत जास्त पुरस्काराची वितरण हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कलाशिक्षण व क्रीडा सामाजिक यामध्ये देण्यात आलेले आहे.
संजीवनी संस्थेकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 पुरस्कार वाटप करण्यात आले त्यामध्ये शैक्षणिक स्मिता विठ्ठलराव शिरसागर यांना आदर्श राज्यस्तरीय मुक्ता कांबळे आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले मंगला लक्ष्मण ठाकरे यांना धन्वंतरी आरोग्यसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सीता भारत भगत यांना उत्कृष्ट वन सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले संजीवनी संस्थेचा उत्कृष्ट असा पुरस्कार वैशाली गजेंद्र निकम राज्यस्तरीय युवा योगा क्रीडा पुरस्कार म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले शिवाजी विठोबा सुरोशे यांना सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार देऊन संमत करण्यात आले तसेच गोपाल भगवानराव तुपकर यांना राज्यस्तरी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले भगवान कचरुबा पाटील संत गाडगेबाबा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले शाहीर गणेश कदम यांना कला गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले इत्यादी पंचवीस पुरस्कार देऊन सन्माननीय संजीवनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सर्वांना सन्मानित करण्यात आले आहे.
