जानाई माता या यात्रेनिमित्त गांगलगाव येथे गंध मराठी मातीचा धर्मवीर प्रतिष्ठान व गजानन वायाळ यांच्या सहकार्यातून भव्य दिव्य संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील रसिकांनी लाभ घ्यावा . माजी जिल्हा परिषद सदस्य डोंगरदिवे. गांगलगावच्या जानाई मातेची यात्रा यंदा उत्साहात – परंपरेचा सोहळा, श्रद्धेचा जल्लोष!

IMG-20251006-WA0030

चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील गांगलगाव ही नगरी दरवर्षी जानाई मातेच्या यात्रेच्या निमित्ताने भक्तीभावाने उजळून निघते. यंदाही दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणारी ही पाच दिवसांची भव्य यात्रा अवघ्या परिसरासाठी श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा सोहळा ठरली आहे.शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात. गांगलगावची ही यात्रा फक्त धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धेचा उत्सव आणि परंपरेचा सन्मान आहे.

या पाच दिवसांच्या कालावधीत लोणार सरोवर परिसरातील कमळजा माता आणि गांगलगाव येथील जानाई माता या दोन्ही देवतांच्या अंगात येण्याचा प्रघात अनेक शतकांपासून चालत आला आहे. गावातील वृद्ध सांगतात की, “या काळात जानाई माता आणि कमळजा माता या देवी गावातील 3 माणसांच्या अंगात देवी अवतरते” अशी भक्तांची अढळ श्रद्धा आणि भावना आहे.

यात्रेचा परमोच्च क्षण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीची वगदी मिरवणूक. या दिवशी हजारो भाविक गावात एकत्र येतात. संपूर्ण गांगलगाव भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून जाते — “जय जानाई माता! जय कमळजा माता!”

या मिरवणुकीत उंच वगदीवर लटकवून गावभर फिरवल्या जातात — ही दृष्य भक्तांच्या हृदयात दरवर्षी नव्या भावनांचा संचार करते.

यंदा यात्रेच्या निमित्ताने मा. श्री. गजानन भाऊ वायाळ यांच्या सहकार्यातून आणि धर्मवीर प्रतिष्ठान, गांगलगाव यांच्या वतीने “गंध मराठी मातीचा” हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि लोककलांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम संपूर्ण परिसरासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

कार्यक्रमात आरती क्रिएशन ग्रुप, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून महाराष्ट्राची लोकधारा, लोककला, आणि मराठी संस्कृतीचे अद्भुत सादरीकरण करण्यात येणार आहे.

ही यात्रा म्हणजे फक्त धार्मिक विधी नाही, तर गांगलगावच्या एकतेचा, परंपरेचा आणि श्रद्धेचा उत्सव आहे. भक्तिभाव, उत्साह, आणि सांस्कृतिक रंग यांचा मिलाफ असलेली गांगलगावची ही यात्रा खऱ्या अर्थाने “गंध मराठी मातीचा” अनुभव देणारी ठरली आहे. या गंध मराठी मातीचा संस्कृती कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील रसिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान माजी जिल्हा परिषद सदस्य डोंगरदिवे यांनी केले आहे .

You may have missed

error: Content is protected !!