मेराखुर्द येथे आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनात संतोष काळे पाटील मित्रमंडळीच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न,९७५ रुग्णांची तपासणी; २६ जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया ७ ऑक्टोबरला…..

IMG-20251006-WA0041

चिखली (एकनाथ माळेकर)
तालुक्यातील मेराखुर्द येथील: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिनांक ४ ऑक्टोबर रोजी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या पुढाकाराने महाआरोग्य शिबिर पार पडले या शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला.या शिबिरामध्ये संभाजीनगर येथील जे.जे. प्लस हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमसह भरोसा येथील डॉ. अक्षय उध्दव थुट्टे आणि डॉ. कु. मोनिका उध्दव थुट्टे यांनी रुग्णांची ईसीजी, बीपी, शुगर तपासणी करून औषधे दिली. तसेच डोळ्यांची तपासणी करून जे.जे. प्लस हॉस्पिटलच्या टीमने अल्पदरात चष्मे उपलब्ध करून दिले.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचा ९७५ रुग्णांनी लाभ घेतला. यापैकी २६ रुग्णांच्या डोळ्यांवर ७ ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे शस्त्रक्रिया होणार आहे, तर १५० रुग्णांचे ईसीजी करून उपचार करण्यात आले.

जे.जे. प्लस हॉस्पिटलकडून १०० बायपास, १०० एंजिओप्लास्टी, १०० स्पाइन आणि १०० डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

हॉस्पिटलच्या टीममध्ये डॉ. जैवंत तावरे, रामेश्वर सुरडकर, विजय राजपूत, पांडुरंग नागपुरे, रणजित राजपूत आदींचा सहभाग होत तर

महाआरोग्य शिबिरास भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, भाजपा सरचिटणीस चंद्रकांत बरदे, भाजपा नेते,अंकुशराव पाटील,डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ, शेतकरी संघटनेचे नेते, प्रकाश आबा घुबे, दिनकरराव घुबे,पत्रकार उद्धव थुट्टे पाटील , पत्रकार कैलास गाडेकर, अंकुश थुटटे पाटिल,ज्ञानेश्वर खरात, डॉक्टर सुनील कायंदे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविताताई पाटील, सिंधुताई तायडे, सुनंदाताई शिनगारे, अर्चनाताई कबुतरे, नीताताई सोळंकी, नीताताई जैन, बाळू वराडे, दीपक शिंगणे, सुधा शिंदे, शिवाजी वाघ, केशवराव होळकर, विनोद थुट्टे,मेरा सरपंच रमेश अवचार , सुनील पडघान, निखिल पडघान, कृष्णा सपकाळ, नवलसिंग इंगळे, गजेंद्र म्हस्के, बालाजी थुट्टे, डिगंबर जाधव, अँड संजीव सदार, भिकाजी खेडेकर, संजय खेडेकर, अभिषेक मापारी, विनायक सरनाईक, भरत जोगदंडे, गोपाल गाडेकर, संतोष गाडेकर, पवन अंभोरे, किशोर परिहार, कैलास राऊत , दीपक शेटे, शेतकरी संघटनेचे नेते, अमीन मुल्ला खासाब, निरजी गायकवाड , दीपक मुरकुटे सर, अमोलजी मोळवंडे, योगेश गवते, गणेश जावळे, सोमेश भाऊ इंगळे, अक्षय इंगळे, विशाल सावडतकर, सौरभ गीते, भास्करराव काळे, श्याम वाकदकर, कैलास सुरडकर, वेदांत चव्हाण, हारुन शाह, फारूक शाह, अवेज देशमुख, शादाब खा, मोसिन शहा, महताब शाह, सुखदेव बाणकर,संतोष काळे पाटील मित्र मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिरास उपस्थित होते

हा महाआरोग्य उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला असून ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने तो आदर्श ठरला आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य व मेहनत घेणाऱ्या सर्व मित्रमंडळींचे तसेच मेरा खुद ग्रामवासियांचे मनःपूर्वक आभार

You may have missed

error: Content is protected !!