राजुर येथे समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला शालेय विद्यार्थ्यांना वृक्षरोपन व स्वच्छतेचा संदेश

IMG-20251007-WA0002

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज)राजुर. ता.मोताळा महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा समाजकार्य पारंगत भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी 6 ऑक्टोबर 2025 रोजी या गावातील जिल्हा परिषद शाळा शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छता व वृक्षारोपणचे केले मार्गदर्शन
जिल्हा परिषद शाळा राजुर येथील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गावातील समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना घेऊन शालेय परिसर स्वच्छ केला व त्यासोबत वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. स्वच्छतेचे महत्व व वृक्षारोपणाचे महत्त्व रामेश्वर तोंडे यांनी सांगितले व आभार प्रदर्शन वैशालीताई लकडे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अविनाश गेडाम सर, प्राध्यापक बोकाडे सर, प्राध्यापक डॉक्टर अस्मिता ठोंबरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळेस एम एस डब्ल्यू भाग दोन चे विद्यार्थी पल्लवी श्रीवास्तव,प्रियंका श्रीवास्तव,निलिमा जाधव, वैशाली लकडे,वैशाली थिगळे, माधुरी वेरुळकर, विद्या गोरे, शुभम निकाळजे,मनीषा पाली, आणि रामेश्वर तोंडे हे उपस्थित राहून परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!