एसटी प्रवर्गातून कुणालाही आरक्षण देऊ नये,आदिवासी समाज बांधव उतरला रस्त्यावर,बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा,धनगर आणि बंजारा बांधवांना एसटी प्रवर्गात सामील करून घेऊ नका
oplus_65554
बुलढाणा :- हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा आणि धनगर समाज अनुसूचित जमातीतून आरक्षण मागत असताना आता अनुसूचित जमातीच्या आरक्षण संरक्षणासाठी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरला आहे. आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांनी भव्य असा मोर्चा काढत आदिवासी समाजाला असलेल्या एसटी प्रवर्गात कुणालाही सामील करून घेऊ नका.. धनगर आणि बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला विरोध करत समस्त आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरला आहे. त्यावेळी आदिवासी समाजाच्या आरक्षणावर खुसखोरी करणाऱ्यांविरोधात देखील कारवाईची मागणी केली जात आहे..

