जिल्हास्तरीय सिरत-उन-नबी स्पर्धेचा भव्य समारोप; १३ हजार विद्यार्थ्यांमधून अंतिम ८०० जणांची निवड; विजेत्यांना उमरा टूर्स पॅकेज व आकर्षक बक्षिसे!
लोणार (यासीन शेख)येथे डॉ. जाकिर हुसेन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि जमियत-उलमा-ए-हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सिरत-उन-नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. पहिल्या फेरीतील तब्बल १३ हजार विद्यार्थ्यांमधून पात्र ठरलेल्या ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या भव्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जगप्रसिद्ध आलिम मौलाना मोहम्मद हुजैफा गुलाम वस्तानवी (अक्कलकुवा) उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून मौलाना अन्वरुल हक, डॉ. शेख साजिद, ॲड. अबिद हुसेन, मौलाना शरीफ खान व मौलाना नसरुल्लाह खान राहिमानी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलचे व्हाइस प्रिन्सिपल नबील शेख आणि डायरेक्टर फैसल शेख यांनी केले. डॉ. फिरोज खान यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर पारितोषिक वितरण नबील शेख यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त व पारदर्शकता राखण्यात आली. सुमारे ५ हजार प्रेक्षक उपस्थित होते.
प्रमुख विजेते (उमरा टूर्स विजेते):
सारा जरमिन इरशाद अली (लोणार), जवेरिया फातिमा (मंठा), शहजीन अंशा (बुलढाणा), मुस्कान शेख आलम (देऊळगाव माही), अम्मारा तबस्सुम (खामगाव), उज़लेफा जरिन (मलकापूर) व सैय्यद मुसअब (रायपूर).
विशेष उमरा पॅकेज शिक्षक मोहम्मद जुनेद (सुलतानपूर) यांनी जाहीर केले.
इतर बक्षीस विजेते:
अलीश्बा तबस्सुम (लॅपटॉप), तरन्नुम सैय्यद (फ्रिज), जमिला कशफ (वॉशिंग मशीन), महेविश फातिमा (वॉशिंग मशीन), आयेशा सिद्दीका व मोहम्मद अनस (आर.ओ. वॉटर फिल्टर), मरयम फिरदौस (गिझर).
तसेच ४६ विद्यार्थ्यांना रोख व पुस्तक पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे आयोजकांनी पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या स्तरावर घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
