कामचुकार ग्राममहसुल आधिकारी यांना वटनिवर आणा चिखलीत ग्राम महसुल अधिकारी गैरप्रकारांविरोधात सत्ताधारी युवासेनेचा एल्गार!शिवाजी किसनराव शिराळे यांच्या नेतृत्वाखाली चिखली तहसीलदारांना निवेदन सादर – तात्काळ कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा!

IMG-20251007-WA0042

चिखली( एकनाथ माळेकर )
चिखली तालुक्यातील अनेक ग्राम महसुल अधिकारी असलेल्या गंभीर गैरप्रकारांविरोधात युवासेना आक्रमक झाली आहे. तालुका युवा सेना विधानसभा संपर्क प्रमुख शिवाजी किसनराव शिराळे यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदार कार्यालयावर मोठ्या संख्येने युवासैनिकांनी हजेरी लावत प्रशासनाला निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की —
अनेक ग्राम महसुल अधिकारी आपल्या कार्यालयात खाजगी व्यक्तींमार्फत शासकीय कामकाज करून घेत आहेत तसेच जनतेकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे. काही ग्राम महसुल अधिकारी वेळेवर कार्यालयात हजर राहत नाहीत, तर काहींनी आपले कार्यालय मुख्यालयाबाहेर चिखली शहरात ठेवले आहे. या गैरप्रकारांमुळे नागरिकांना अनावश्यक त्रास, वेळेची नासाडी आणि प्रवास खर्चाचा बोजा सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवाजी शिराळे यांनी चिखली तहसीलदारांना इशारा दिला की —

“जर या गैरप्रकारांवर तात्काळ व कठोर कारवाई झाली नाही,
तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
आणि त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास
त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.”

या निवेदनावेळी उपस्थित होते —
उपजिल्हाप्रमुख शिवाजी बापू देशमुख, शिवसेना नेते रवींद्र काकडे, गोपीनाथ लहाने, अमर सुसर, श्रीकांत टेरे, अशोक पवार, अमर काळे, पंजाबराव जावळे, बंडू नेमाने, दीपक शेळके, राजेंद्र मस्के, रवी अंभोरे, दीपक रगड, स्वप्निल जाधव, नानाभाऊ जाधव, खरात साहेब, विजयाताई भारती, आशाताई देशमुख तसेच महिला व युवा सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!