रुग्णा सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा संतोष काळे पाटील
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांनी विश्रामगृह येथे 4 ऑक्टोबर 2025 रोजी रुग्णासाठी मेरा खुर्द येथे सर्वसामान्य जनतेसाठी मोठे शिबिराचे आयोजन केले होते त्यावेळी हजारो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला होता त्या शिबिरामध्ये ज्या लोकांना (संभाजी नगर)समोरील उपचाराची गरज होती त्या उपचारासाठी संतोष काळे पाटील यांनी स्वखर्चाने रुग्णांना संभाजीनगर येथे जाण्यासाठी प्रयत्न केले आहे त्यां मध्ये समाजप्रती असलेले आपुलकी दिसून येत आहे राजकारणाबरोबरच समाजकारण आणि त्यामध्येही रुग्णसेवा श्रेष्ठ सेवा हे गुण दिसून आला आहे संतोष काळे पाटील हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून त्यांना सर्वसामान्य जनतेला आज काय पाहिजे याची जाण आहे त्यामुळेच त्यांनी मेरा खुर्द येथे मोठे शिबिर घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारे गोष्ट म्हणजे दुखणे आणि त्यावरच संतोष काळे पाटील यांनी इलाज केला आहे आणि केवळ इलाज न करता त्यांनी त्या रुग्णांना संभाजीनगर जाण्यासाठी रवाना सुद्धा केली आहे मेरा खुर्द परिसरातील हे पहिले शिबिर असेल की जे नसते तपासण्या न करता समोरील इलाज सुद्धा आयोजकांनी केला आहे त्यामुळे मेरा खु परिसरातील लोकांनी संतोष काळे पाटील यांचे कौतुक केले आहे भाजपा युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष मा. संतोष काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आरोग्य शिबीरामध्ये ज्या रुग्णांना ऑपरेशन करावे लागणार होते ते इलाज सुद्धा संतोष काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर येथे झाली होणार आहे
या मध्ये शिबीर हे फक्त नावासाठी नसून हे शिबिर जनतेच्या निस्वार्थी सेवेसाठी आहे हे या मधून लक्ष्यात येते…
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे
या वेळी उपस्थित मेरा खुर्द येथील
बाळू भाऊ वराडे (शिवसेना नेते) (सरपंच ) रमेश अवचार
सुधा भाऊ शिंदे (सामाजिक कार्यकर्ते)
उद्धव पाटील थुट्टे (पत्रकार)
दिपक भाऊ शिंगणे आणि परिसरातील संतोष भाऊ काळे पाटील मित्र मंडळ उपस्थित होते
