चार चाकी वाहन स्लीप होऊन १ जण जागीच ठार तर तिघे जखमी लोणार तालुक्यातील घटना
Oplus_16777216
लोणार : लोणार तालुक्यातील मेहकर लोणार रस्त्यावरील वडगाव तेजन जवळ चार चाकी वाहन पलट्या होऊन भीषण अपघात १ जण जागीच ठार तर तिघे जखमी मध्यरात्री मेहकर वरून लोणार कडे येत असताना झाला अपघात ऋषभ बाबुलालजी बगडिया (२६, रा.लोणार) अपघातात ठार झाले असून भाजप शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह तिघे जखमी असून त्यांच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार एम एच २८, बी. डब्ल्यू ०९५९ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चार चाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री बाराच्या सुमारास मेहकर वरून लोणार कडे जात होते. काल दिवसभर मेहकर लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमीन खरडून गेली..
वडगाव तेजन जवळ पुरामुळे शेतातील माती खरडून रस्त्यावर आलेली होती. त्या मातीवर चार चाकी वाहन स्लीप होऊन गाडीने पलटी मारल्याने या अपघातात ऋषभ बाबुलालजी बगडिया याचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. अपघात येवढा भीषण होता गाडीने चार पाच पलटी मारली.गाडीचा समोरचा भाग चकणाचूर झाला.
