डोंगर शेवली येथे शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न
चिखली (गजानन दसरकर ) जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगर शेवली येथून साखळी खुर्द येथे बदलून गेलेल्या सौ संगीताताई सतीश शेळके तसेच कु. वंदना विश्वनाथ जाधव ह्या सातगाव म्हसला येथे बदली होऊन गेले त्यांचा निरोपाचा कार्यक्रम दिनांक 8 ऑक्टोबर 2025 ला घेण्यात आला यावेळी त्यांच्या हस्ते शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे उच्च श्री मुख्याध्यापक श्री अनिल लोखंडे सर हे होते कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अनाळकर साहेब शाळेच्या माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सोनूने मॅडम, तसेच सेवानिवृत्त प्राचार्य सावळे सर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये मा. श्री अना ळकर साहेब सौ सोनूने मॅडम,दांदडे सर, वाघमारे सर कुळकर्णी सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ दुनगु मॅडम यांनी केले.. यावेळी शाळेच्या वतीने त्यांना साडीचोळी देऊन तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या त्या सुद्धा दिल्या.
शाळेत येत असताना शेळके मॅडम जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ म्हणून केळी आणल्या होत्या त्यांचे वाटप सुद्धा मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी जाधव मॅडम आणि शेळके मॅडम यांनी शाळेमध्ये बसण्यासाठी म्हणून सहा सिमेंटचे बेंच शाळेला भेट म्हणून दिले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे आहेत. आतापर्यंत कधी ज्यांनी भाषण केलं नाही असे विद्यार्थी आपल्या शिक्षिकेच्या प्रेमापोटी या विद्यार्थ्यांनी पहिले भाषण या ठिकाणी केलं आणि त्यांना गहिवरून आले. यावेळी सर्व भावनिक झाले होते..
यावेळी नव्याने रुजू झालेले श्री सुमंत सावळे सर, श्री कुलकर्णी सर ,श्री पडोळ सर यांचा सुद्धा रुमाल टोपी देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले .
तसेच आमच्या शाळेतील तरुण व्यक्तिमत्व सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवणारे श्री सतीश दांदडे सर यांचा सुद्धा काल वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला. यावेळी सरांनी वाढदिवसानिमित्त शाळेसाठी 11000 ची देणगी जाहीर केले यावेळी सर्वांनी त्यांच्या या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले..
कार्यक्रमानंतर शाळेमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी व मान्यवरांची जेवणाची व्यवस्था केलेली होती यासाठी शाळेतील सर्व आमचे सहकारी बंधू ,भगिनी, खिचडी शिजवणाऱ्या आमच्या कर्मचारी यांनी सहकार्य केले आणि कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडला..
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंत्रिमंडळातील सांस्कृतिक मंत्री कु. सोनाक्षी विलास पूर्वे हिने केले. तर आभार प्रदर्शन कु.अस्मिता दिलीप राठोड हिने मानले ..
