बुद्ध आणि त्यांचा धम्म जिवंत ठेवण्याचे काम सावंगी वासीय करतात-ठाणेदार संजय मातोंडकर….
सिंदखेडराजा (अनिल दराडे)विश्वशांती बुद्ध विहार सावंगी टेकाळे येथे 3 महिन्यापासून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण चालू होते ग्रंथाच्या सांगता समारोप प्रसंगी किनगावराजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर बोलत होते .
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की ,या ग्रंथामध्ये तथागत गौतम बुद्धांनी डाकू अंगुलि माल सारख्या माणसाला तथागतांनी नमविले हे सुद्धा तुम्ही या ग्रंथात पठण श्रवण केले .प्रत्येकाने बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे शिका ,संघटित व्हा संघर्ष करा हे मिशन अवलंबले पाहिजे या गावातील सर्व समाज बांधवांचा एकोपा बघून मला आनंद होत आहे माझ्या पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावा पैकी सावंगी टेकाळे हे गाव अस आहे की या गावातील जनतेने बुद्ध आणि त्यांचा धम्म जिवंत ठेवण्याचे काम केले आहे .
या वेळी बुद्ध विहार समितीचे वामनराव झोटे ,सरपंच शिवाजीराव झोटे,उपसरपंच दिपक बुरकुल यांनी सुद्धा आपले विचार मांडले ,या वेळी गावातून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली सर्व परिसर घोषणेने दणाणून गेला होता ,
विशेष म्हणजे गावातील भजनी मंडळींनी आपल्या गाण्यातून मिरवणुकीतील उपासक उपासिका व गावकऱ्यांची मने जिंकली .सर्व प्रथम ठाणेदार संजय मातोंडकर यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवराय ,तथागत भगवान गौतम बुद्ध माँ जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करून पंचशील ग्रहण करण्यात आले .ग्रामपंचायत व स्मारक समितीच्या वतीने ठाणेदार साहेबांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमासाठी गावातील मोठ्या संख्येने पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून महिला , बाल ,बालिका ,पुरुषांची उपस्थिती होती
कार्यक्रमांचे प्रास्ताविक सरपंच शिवाजीराव झोटे तर सूत्र संचालन युवराज झोटे यांनी केले.
