विदर्भात हिरवाईचे नवे युग – पैनगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पाने खुलला विकासाचा नवा मार्ग! शेतकऱ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी ऐतिहासिक संधी – शिवाजी शिराळे…..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)विदर्भाच्या कोरड्या मातीत आता हिरवाईची पालवी फुटण्याची वेळ आली आहे.
दशकानुदशकं पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी
पैनगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्प म्हणजे केवळ योजना नाही,तर नवजीवनाचं वचन ठरणार आहे.या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून,
या माध्यमातून बुलढाणा, अकोला, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाचं वरदान मिळणार आहे.शेती, पिकं, आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना यामुळे मोठा हातभार लागेल.शिवाजी शिराळे यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं “विदर्भातील शेतकऱ्यांचा हा खऱ्या अर्थाने विजय आहे.
प्रतापराव जाधव साहेबांनी या प्रकल्पाला जे स्वरूप दिलं,
ते म्हणजे जनतेच्या विश्वासाचं उत्तर.
आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी आणि आनंद दोन्ही वाहतील.”शिराळे पुढे म्हणाले “आज हेलिकॉप्टरमधून होणारं सर्वेक्षण हे फक्त तांत्रिक पाऊल नाही,
तर हजारो कुटुंबांच्या आशेचं प्रतीक आहे.
या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार,
शेतीला स्थैर्य आणि गावांना समृद्धी मिळेल.”
या नदीजोड प्रकल्पामुळे
🔹 हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार,
🔹 पिकांची उत्पादकता वाढणार,
🔹 आणि शेतकऱ्यांचा आत्मविश्वास पुन्हा फुलणार आहे.
विदर्भाच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचे अश्रू आता घामात रुपांतरित होणार,आणि घामातून उगवणार आहे नव्या “हरित विदर्भा”चं स्वप्न. शिवाजी शिराळे शेतकरीहित चिंतक | समाजसेवक | विदर्भ विकासासाठी समर्पित कार्यकर्ते
