विशेष मदत पॅकेजपासून वंचित चार तालुके अतिवृष्टी व पूर बाधित घोषित करा – केंद्रीयमंत्री ना. प्रतापराव जाधव मेहकर, लोणार, जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यात विशेष मदत पॅकेज व सवलती लागु करा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी चर्चा शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

Screenshot_2025-10-10-19-59-30-59_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज )अतिवृष्टीने बाधित झालेल्या आपदग्रस्तांसाठी शासनाने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमधून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर , लोणार ,जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुके वंचित राहीले आहे . ही बाब केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधुन निदर्शनास आणून दिली आहे .तर जिल्हाधिकारी यांना सुद्धा काही तांत्रिक चूक झाली का ? यांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले आहे ..

जुन ते सप्टेंबर महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आपतगस्तांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या वतीने 9 सष्टेबर रोजी शासन निर्णय निर्गमित झाला आहे . या अपादग्रस्त मदत यादीत राज्यातील 253 तालुक्यांचा समावेश आहे या तालुक्यात ढगफुटी अतिवृष्टी आणि पुर परिस्थितीमुळे क्षेत्र बाधित झाले होते या शासन निर्णयामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 9 तालुक्यांचा समावेश आहे परंतु 16 सष्टेबरला मेहकर ,लोणार संग्रामपूर आणि जळगाव जामोद संग्रामपूर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती पण आपदतग्रस्तांच्या मदतीसाठी निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये या चारही तालुक्यांचा समावेश नाही . सदरची बाब केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे . या संदर्भात त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्याशी सुद्धा संपर्क साधला आहे बुलढाणा जिल्ह्यातील हे चारही तालुके अतिवृष्टीने बाधित असताना या तालुक्यांचा समावेश का झाला नाही काही तांत्रिक चूक राहून गेली का ? हे तपासून पाहण्यासंदर्भात त्यांनी निर्देशित केले . या चारही तालुक्यांचा समावेश शासनाच्या आपदग्रस्त मदत यादीत समावेश करण्यासंदर्भात शासन स्तरावरही चर्चा केली आहे .. शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत…

You may have missed

error: Content is protected !!