राजूर येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
मोताळा (रामेश्वर तोंडे) मोताळा दिनांक 10 ऑक्टोबर 2025 संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती द्वारा संचालित, महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय बुलढाणा यांच्या वतीने एम एस डब्ल्यू भाग २ सेमेस्टर तीन चे विद्यार्थी यांनी कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न केले. कायदेविषयक सल्ला देण्यासाठी ॲड. प्रियंका श्रीवास्तव,व ॲड.पल्लवी श्रीवास्तव यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. घरगुती समस्या, शेतातील समस्या, गावातील समस्या, यांच्यावर मार्गदर्शन केले. याचबरोबर प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अविनाश गेडाम सर, प्राध्यापक बोकाडे सर, प्राध्यापिका डॉक्टर अस्मिता ठोंबरे मॅडम हे उपस्थित मार्गदर्शन केले.
यावेळेस एम एस डब्ल्यू भाग दोन चे विद्यार्थी व वैशाली लकडे यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रदर्शन वैशाली थिगळे यांनी केले. यावेळेस माधुरी वेरुळकर, विद्या गोरे, शुभम निकाळजे, मनीषा पाली व रामेश्वर तोंडे हे उपस्थित राहून परिसर घेतले.
