सिनेस्टाईल अपहरण प्रकरणानं मोताळा शहरात खळबळ,पालक वर्गात भीतीचे वातावरण…..

Screenshot_2025-10-10-20-26-46-42_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मोताळा ( बुलढाणा माझा न्युज)मलकापूर शहरात आज सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेनं पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी सुमारे आठ वाजता गांधी चौक परिसरातून एक १४ वर्षीय मुलगी आणि तीन शालेय मुलांचे अपहरण केल्याची घटना उघड झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून हे सर्व मुलं-मुली पळवून नेण्यात आले होते.

ही कार संशयास्पदरीत्या मोताळा रोडवरील मिर्झा हाऊस परिसरात दिसल्याने ट्राफिक पोलीस अंमलदार मंगेश पवार यांनी तत्परता दाखवत कारला अडवले.पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. कारमधून पळवून नेलेली मुलगी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिला तत्काळ डॉ. महाजन यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे. अपहरणाचा हेतू काय होता, कारमधील व्यक्ती कोण होते आणि त्यांनी ही कार कुठून आणली याचा शोध पोलीस घेत आहेत.या प्रकारामुळे शहरात आणि आसपासच्या भागात पालकवर्गात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी आपल्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!