ऑक्टोबरमध्येच बुलढाणेकरांना गुलाबी थंडीची चाहूल; वातावरणात मोठा बदल…

Screenshot_2025-10-11-08-17-52-58_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज) बुलढाणा शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वातावरणात मोठा बदल दिसून आला आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसण्याची शक्यता असताना, यावर्षी मात्र त्याची तीव्रता बरीच कमी झाली आहे. बोलण्याचे किमान तापमान २० ते २१ अंशापर्यंत आल्याने परिणामी, गुलाबी थंडीची चाहूल बुलढाणेकरांना लागू लागली आहे. आगामी दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

मागच्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर बुलढाणामध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. दिवसाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर असले तरी, रात्रीच्या तापमानात मोठी घट नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबरपर्यंत रात्रीचा पारा २४ अंशावर होता, तर शुक्रवारी रात्री बुलढाणा शहरातील रात्रीचा पारा १९ अंशापर्यंत खाली आला होता. आगामी काही दिवस जिल्ह्यात १८ ते १९ अंश असे तापमान रात्रीच्या वेळेस रहात असल्याची शक्यता आहे.
सध्या रात्रीच्या वेळीस आणि सकाळच्या वेळेस थंड वारे वाहत असून यामुळे बुलढाणेकरांना थंडीची चालून लागली आहे. खरतर यंदा ऑक्टोबर हीटची तीव्रता कमी होण्याचे आणि लवकर थंडी जाणवण्याचे प्रमुख कारण म्हणजे उत्तर भारतात झालेली बर्फवृष्टी आहे.
दोन दिवसांपूर्वी उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भागांत बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे आता महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत, ज्यामुळे बुलढाण्यात गारवा अनुभवायला मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या आठवड्यात तापमानात आणखी चांगली घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुलढाण्यात यंदा लवकर थंडीचे आगमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!