सिंदखेडराजा तालुक्यातील दहा पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर
सिंदखेडराजा( अनिल दराडे)
सिंदखेडराजा तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी दहा गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यामध्ये पाच गण महिला आरक्षित करण्यात आले आहेत. पंचायत समितीचे जिजामाता सभागृहात तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, ना. तहसीलदार नितीन बडे , नागोराव खरात यांनी आरक्षण सोडत काढण्यात आली. महिला आरक्षणासाठी चिठ्ठ्या काढण्याचा मान आस्ता आकाश पवार या बालिकेला देण्यात आला. उपस्थित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आली.
पंचायत समिती गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे:
वर्दडी बु. सर्वसाधारण (महिला)
सावखेड तेजन सर्वसाधारण
किनगाव राजा नागरिक मागास प्रवर्ग (महिला)
वाघाळा सर्वसाधारण
दुसरं बीड सर्वसाधारण (महिला)
सोनोशी अनुसूचित जाती
शेंदूरजन सर्वसाधारण
मलकापूर पांग्रा नागरिक मागास प्रवर्ग
साखरखेर्डा सर्वसाधारण (महिला)
सवडद अनुसूचित जाती (महिला)
एकूण १० गणांपैकी ५ गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत.
सिंदखेडराजा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांचे आरक्षण
बुलढाणा येथे काढण्यात आले
साखरखेर्डा सर्वसाधारण (महिला)
शेंदूरजन नागरिक मागास प्रवर्ग (महिला)
दुसरबीड अनुसूचित जाती (महिला)
किनगाव राजा सर्वसाधारण
वर्दडी बु. नागरिक मागास प्रवर्ग (महिला)
या आरक्षण जाहीरतीमुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांनी निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे. पंचायत राज व्यवस्थेतील महिलांचा वाढता सहभाग हे सशक्त लोकशाहीचे संकेत आहेत
