फासे पारधी समाजाला हक्काची घरे, घरकुल योजना व सिमेंट रस्ता देण्याची मागणीआदिवासी पारधी क्रांती संघटनेची आमदार मनोज कायंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

Screenshot_2025-10-12-15-29-45-54_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिदखेडराजा( अनिल दराडे )
आदिवासी पारधी क्रांती संघटना, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. श्री. विनोद डाबेराव व जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय जयराम भोसले यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोजभाऊ कायंदे यांना निवेदन सादर करून दुसरबीड व सिंदखेडराजा तालुक्यातील फासे पारधी समाजाला हक्काची घरे, घरकुल योजना आणि सिमेंट रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, मौजे दुसरबीड व सिंदखेडराजा तालुक्यातील फासे पारधी समाजातील कुटुंबे गेल्या 20 ते 25 वर्षांपासून अतिक्रमित जागांवर वास्तव्यास आहेत. मात्र, या कुटुंबांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. तसेच वस्तीपर्यंत सिमेंट रस्ता नसल्याने नागरिकांना दैनंदिन अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील फासे पारधी समाजाला आमदार मनोजभाऊ कायंदे यांच्या प्रयत्नांतून घरकुल योजना व हक्काची घरे मिळाली. त्याच धर्तीवर दुसरबीड व सिंदखेडराजा तालुक्यातील फासे पारधी समाजालाही हक्काचे घर, घरकुल योजना आणि सिमेंट रस्ता मंजूर करून द्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

You may have missed

error: Content is protected !!