केळीचा ट्रक घेऊन जाणाऱ्या आयशरचा अपघात दोघांचा मृत्यू तर ५ गंभीर जखमी, सोनाळा रस्त्यावरील घटना….

Screenshot_2025-10-12-14-14-14-68_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

संग्रामपूर (बुलढाणा माझा न्यूज) बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी-सोनाळा रस्त्यावर शनिवारी रात्री सुमारे ९ वाजता एमएच ४८ एवाई ४८१५ क्रमांकाचा केळीने भरलेला आयशर ट्रक जात होता. या ट्रकमध्ये एकूण आठ मजूर बसेलेले होते. अचानक हा ट्रक उलटला आणि या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. सविस्तर वृत्त असे की केळीने भरलेला ट्रक जळगाव, जामोद-अकोट मार्गाने अंजनगावकडे जात होता. ज्यामध्ये हे आठ मजूरही होते. टूनकी गावाजवळ ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले अन् हा अपघात झाला. या अपघातातले मजूर व जखमी सर्व मजूर हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांच्या मदतीने आणि जेसीबीच्या सहाय्याने पलटी झालेल्या ट्रकखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

You may have missed

error: Content is protected !!