राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नेमकी कुणामुळे?राजकारण्यांमध्ये लागली श्रेय लाटण्याची चढाओढ, पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा! तर सत्ताधारी आणि विरोधक श्रेयासाठी आक्रमक पण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम….
बुलढाणा (एकनाथ माळेकर) सप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध केलेला आहे मात्र या मदतीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस सुरू झाली आहे.
मदत जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि विरोधी पक्षनेते यांच्यातील श्रेयवादामुळे शेतकऱ्यांच्या मदतीवर राजकीय रंग चढलेला दिसतो. काही नेत्यांनी आपल्या पाठपुराव्यामुळेच ही मिळाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमकी मदत कुणाच्या पाठपुराव्यामुळे मिळाली, असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळण्याची प्रक्रिया
अतिवृष्टी किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची मदत मिळण्यासाठी शासनाची ठराविक प्रक्रिया असते. सर्वप्रथम, महसूल आणि कृषी विभाग संयुक्तपणे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार करतात. त्यानंतर, या पाहणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नोंद शासनाच्या अधिकृत पोर्टलवर केली जाते. यानंतर, जिल्हास्तरावरील तांत्रिक समिती या अहवालांची पडताळणी करते आणि निश्चित निकषांनुसार राज्य शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवते. त्यानुसार, राज्य सरकारमधील मदत व पुनर्वसन विभाग आर्थिक मदतीबाबत निर्णय घेतो व अधिकृत परिपत्रक जारी केले जाते. शेवटी, मंजूर झालेली मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, जेणेकरून कोणत्याही मध्यस्थाशिवाय लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये श्रेय घेण्यासाठी चढावड लागली आहे पण शेतकरी सत्ताधारी आणि विरोधकांचे याकडे लक्ष न देता आपल्या शेतामध्ये जो काही अतिवृष्टीच्यामधून वाचलेला शेतीमाल आहे तो कसा वाचवायचा याकडे लक्ष देत आहे एकंदरीत शेतकरी हे सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडे कटाक्ष नजरेने बघत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जनतेचा कल ग्रामीण भागातील जनतेचा कल दिसून येणार आहे आणि खरोखरच मदत कोणामुळे मिळाली आहे हे सुद्धा लवकरच सिद्ध होणार आहे.
