संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये प्रा. बळीराम जाधव सरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

IMG-20251013-WA0043

सिंदखेडराजा (अनिल दराडे)
संत सावता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बळीराम जाधव सर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जालना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते सुशील साळवे सर उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनातील यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक मूल्ये समजावून सांगण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे प्राचार्य सुधाकर गोफने सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सहशिक्षक तेजराव घुगे, अभिजित मेहत्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख वैष्णवी अंभोरे, रुख्मिणी तौर, पायल पवार, दिपाली सातपुते, उषा काळे, तसेच सेवक मनीष बुंधे उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला. संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

You may have missed

error: Content is protected !!