ग्रा.प.कर्मचारी पदी नियुक्ती करण्यासाठी खामगांव पंचायत समिती समोर पाळा येथील संपूर्ण कुटुंबाचे अन्नत्याग उपोषण सुरु.

IMG-20251013-WA0020

खामगाव (बुलढाणा माझा न्यूज ) खामगाव तालुक्यातील पाळा येथील मयत कैलास गाढवे यांचा मोठा मुलगा. ओम कैलास गाढवे हा वडील गेल्यापासून कुटुंब प्रमुख सर्व घराची जबाबदारी पाहत आहे. कैलास गाढवे यांचे असे म्हणणे आहे की.३ ते ४ वर्षाआधी माझे वडील मयत झाले आहे. तेव्हापासून सतत गेल्या तीन चार वर्षा पासून सरपंच. सचिव ग्रां.प.पाळा व संबधित वरिष्ठ अधिकारी यांचे कडे वारंवार विनंती अर्ज निवेदन देऊन अनुकंपा अंतर्गत ग्रां प कर्मचारी पदी नियुक्ती केली नाही, मझ्या घरातील कर्ता पुरुष गेल्याने माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. जो पर्यंत नियुक्ती पत्र माझ्या हातात मिळत नाही तो पर्यंत माझे व माझ्या कुटुंबाचे अन्नत्याग उपोषण हे सुरूच राहील.
या सुरू असलेल्या उपोषणात सहभागी कुटुंबातील सदस्यांना कोणतीही जीवितहानी झाली तर याला जबाबदार फक्त सरकार शासन राहील. माझ्या परिवारातील उपोषण करते. माझी आजी. आजोबा आई लहान बहीण पल्लवी व लहान भाऊ आहे.

You may have missed

error: Content is protected !!