कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाची शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३३ वी सभा संपन्न
बुलढाणा (एकनाथ माळेकर) दि. १४ ऑक्टोबर,२०२५ रोजी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा द्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची ३३ वी सभा मौजे पोखरी, ता. बुलढाणा येथे दत्तात्रय टेकाळे यांच्या शेतात आयोजित करण्यात आली होती.या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे, डॉ.जगदीश वाडकर, विषय विशेषज्ञ- विस्तार शिक्षण,डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, विषय विशेषज्ञ- पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ, कृषि संशोधन केंद्र, बुलढाणाचे प्रमुख, डॉ. दिनेश कानवडे, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.गजानन जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, बुलढाणा, दीपक बुटे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा,बुलढाणा, तर गजानन इंगळे-तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,आत्मा,बुलढाणा, संदीप अंभोरे, उप कृषि अधिकारी,बुलढाणा कु. बोर्डे, कु.शेळके-सहायक कृषि अधिकारी, सोहम बेलोकार- कृषि सल्लागार(पोक्रा प्रकल्प) तसेच विजय भुतेकर, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा व स्वप्निल महाजन, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी संशोधन केंद्र बुलढाणा आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनेश यदुलवार यांनी, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची शेती विकासातील भूमिका विषद केली व हवामान आधारित कृषि सल्ला सेवेचे महत्व उपस्थितांना सांगितले.
डॉ. गजानन जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, बुलढाणा यांनी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय यामध्ये आवश्यक असणाऱ्या लसीकरणाची विस्तृतपणे माहिती उपस्थितांना दिली. तसेच दुधाळ जनावरांना वारंवार लागण होणाऱ्या रोगांबाबत नियंत्रणासाठी उपाययोजना सांगितल्या.
कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. अमोल झापे यांनी यावेळी बोलताना सांगितले कि, शेती जिवंत ठेवण्यासाठी व मातीची सुपीकता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. पिकांची फेरपालट, हिरवळीच्या खतांचा वापर करून सेंद्रिय कर्ब वाढविणे, शेतीपूरक दुग्धव्यवसाय ई. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढेल जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही व शेती क्षेत्राला चांगले दिवस येतील. तसेच विद्यापीठ निर्मित जैविक निविष्ठांच्या वापराने शेतीमध्ये पिक व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करता येतो.
डॉ. नरेंद्रकुमार देशमुख, विषय विशेषज्ञ- पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र यांनी चारा पीक लागवड तंत्रज्ञान, दुधाळ जनावरांचे आहार व्यवस्थापन, पशुखाद्य तसेच जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी-म्हशीच्या जातीविषयी सखोल मार्गदर्शन केले.
दीपक बुटे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा,बुलढाणा, यांनी परंपरागत कृषि विकास योजनेची माहिती सांगितली व सेंद्रिय शेतीचे महत्व विषद केले.
स्वप्निल महाजन, अध्यक्ष-शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी संशोधन केंद्र बुलढाणा यांनी शून्य मशागत तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
यानंतर शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये रब्बी पीक नियोजन व व्यवस्थापन तसेच शेतीपूरक व्यवसाय यावर साधक बाधक चर्चा झाली. तसेच शेतकरी-शास्त्रज्ञ यांनी दत्तात्रय टेकाळे यांच्या डेअरी युनिटला भेट दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंजाबराव टेकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दत्तात्रय टेकाळे यांनी केले.
सदर कार्यक्रमास शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य राजु पालकर, आंनद लहाने, जगदीश गुळवे, आप्पा गुंजकर, हरीभाऊ शिनकर, प्रकाश सपकाळ, गणेश तायडे, विष्णु गडाख, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. दत्तात्रय टेकाळे, श्री. संदीप टेकाळे, श्री.विजय टेकाळे, श्री.अरुण टेकाळे, श्री. प्रशांत औतकर, श्री. महेश सावळे आदिंनी परिश्रम घेतले.
