कैलास नागरे यांच्या कुटुंबाला शासनाने टाळले तर शिवनिश्चल ट्रस्ट च्या माध्यमातून यशवंत गोसावी यांच्याकडून मदत…

Screenshot_2025-10-14-19-35-26-50_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

दे राजा (एकनाथ माळेकर) देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कै कैलास नागरे यांनी काही दिवसापूर्वी शेतीच्या पाण्यासाठी शासनाला वारंवार सांगुन सुद्धा शासन त्यांचा एकत नव्हते गांधीगिरी च्या मार्गाने अनेक वेळा उपोषण सुद्धा केले होते त्यामुळे त्यांनी शासन जर आपले ऐकत नसेल हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी अखेर शेवटी या जगाचा निरोप घेऊन स्वतःच संपून घेतले आज त्यांना जाऊन बरेच दिवस झाले परंतु शासनाने जे त्यांच्या कुटुंबाला आश्वासन दिले होते त्यांच्या मुलाचे शाळेचे पालकत्व शासनाने घेतले होते त्याचा सुद्धा विसर शासनाला पडला आहे कै कैलास नागरे हे चळवळीतील शेतकरी असल्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती याची दखल घेऊन शिव निश्चल ट्रस्टचे सर्वेसर्वा यशवंत गोसावी सर यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन आणि त्यांना ज्यावेळेस कळाले की सदर कुटुंब हे शासनाच्या सर्वच योजनेपासून दूर आहे त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचा सुद्धा मोठा विषय आहे देवळगाव राज्याचे तहसीलदार डोंगरजाळ मॅडम यांनी त्यांना शिक्षणाचे पत्र दिले परंतु त्यावर शाळेने आम्हाला जोपर्यंत फी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुलांना शिक्षण देणार नाही देऊळगाव राजा तहसीलचे तहसीलदार मॅडम यांच्या पत्राला शाळेने केराची टोपली दाखवली आहे यशवंत गोसावी सर यांनी शिवनी आरमाळ येथे राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलासवासी कैलास नागरे यांच्या घरी भेट दिली असता त्यांचे वडील आणि विधवा पत्नी यांनी सविस्तर माहिती यशवंत गोसावी सर यांना दिले त्यावेळेस मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करेल आणि जे पत्र देळगाव राजा तहसीलच्या तहसीलदार मॅडम वैशाली डोंगरजाळ यांनी दिले होते त्या पत्राची पत्रावर मी नक्कीच शासनाला दखल घ्यायला लावेल असे आश्वासन सुद्धा यशवंत गोसावी सर यांनी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलासवासी शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबाला भेट दिली असता दिली आहे यावेळी शुभम खडसे विनोद देशमुख एकनाथ माळेकर व कै कैलास नागरे यांचे साले गजानन डोईफोडे उपस्थित होते

You may have missed

error: Content is protected !!