बुलढाणा जिल्ह्यासाठी दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे स्वागत.शासनाच्या जमिनीवरील गैरवापर थांबविण्यासाठी ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Screenshot_2025-10-15-13-54-07-23_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

बुलढाणा (निलेश कोल्हे) आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या जमिनीवरील बेकायदेशीर वापर आणि ताब्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या पत्र क्रमांक स.म.क्र./कवि/1799/2025 दिनांक 18/09/2025 नुसार, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांनी पत्र क्रमांक का.वि./प्र.१/१४४२/२०२५ दिनांक २५/०९/२०२५ द्वारे सर्व तहसीलदार तथा नगर परिषद मुख्य अधिकारी यांना तसे निर्देश दिले आहेत की शासनाच्या जमिनीवर कोणत्याही संस्थेकडून, ट्रस्टकडून किंवा व्यक्तीकडून अनधिकृत वापर केल्यास तात्काळ तपासणी करून नियमांनुसार कारवाई करण्यात यावी.

या निर्णयामुळे शासनाची संपत्ती सुरक्षित राहील आणि सर्वसामान्य जनतेचा हक्क अबाधित राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयाचे बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र स्वागताचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक, सामाजिक संस्था आणि शेतकरी बांधवांनी एकमुखाने आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या मागणीचे व पाठपुराव्याचे कौतुक केले आहे.
जिल्ह्यातील विविध भागांत लोकांनी “आझाद हिंद शेतकरी संघटना जिंदाबाद” अशा घोषणा देत ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांच्यावर स्वागताचा वर्षाव केला.

ॲड. सतीशचंद्र रोठे पाटील यांनी या प्रसंगी सांगितले की,

“हा निर्णय हा जनतेच्या जागृतीचा आणि सत्याच्या विजयाचा परिणाम आहे. शासनाच्या जमिनी जनतेच्या मालकीच्या आहेत — त्या कोणाच्याही ताब्यात जाऊ देणार नाही. आम्ही न्याय, नियम आणि ग्रामस्वराज्य यासाठी सदैव लढत राहू.”
हा निर्णय बुलढाणा जिल्ह्याच्या भावी विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण ठरणार असून, शासन आणि प्रशासनाचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणारा मानला जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!