सिंदखेडराजा तहसील कार्यालयात अतिवृष्टी मदतीच्या वाटपासाठी विशेष नियोजन शिबिर संपन्न….

IMG-20251015-WA0028

सिंदखेडराजा (अनिल दराडे) नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी लवकरात लवकर देण्यासाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या वतीने एक दिवसीय विशेष नियोजन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.मा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली
तहसीलदार श्री. अजित दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅम्पमध्ये महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तिन्ही यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. यामध्ये गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, नायब तहसीलदार, कृषी मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता.

शिबिरातील महत्त्वाचे मुद्दे:
ऑगस्ट महिन्यातील मदतीच्या उर्वरित याद्या तात्काळ जमा करण्यावर भर देण्यात आला.
सप्टेंबर महिन्याच्या बाधित याद्या कशा तयार कराव्या, याबाबत सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील सप्टेंबर मधील एकूण ११० बाधित गावांपैकी ४७ गावांच्या याद्या कॅम्पदरम्यान प्राप्त झाल्या.
पुढील दोन दिवसांत उर्वरित सर्व याद्या पूर्ण करण्याचे आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या त्रि-सूत्रीय यंत्रणांच्या एकत्रित सहभागामुळे मदत वाटपाचे काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने व गतीने पूर्ण होईल, याची खात्री करुण सामाईक क्षेत्र असेल त्यानी दोन दिवसांत तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्या कडे दोन दिवस जाता करूण देणे असे आह्वान तहसिलदार अजित दिवटे यांनी केले आहे

You may have missed

error: Content is protected !!