स्किल पॅरामेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची दिव्य सेवा प्रकल्पाला भेट…..
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) आमच्या स्किल पॅरामेडिकल कॉलेज बुलढाणा या संस्थेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी समाजसेवा भावना जागविण्याच्या उद्देशाने दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा येथे शैक्षणिक भेट राबवण्यात आली. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी अनाथ बेवारस व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तींना या प्रकल्पामध्ये आश्रय दिला जातो अशा व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांना अन्न कपडे व आवश्यक साहित्याची वाटप केले
या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना समाजातील वंचित घटकांविषयी संवेदनशीलता सहानुभूती आणि सेवाभावाची जाणीव झाली . या उपक्रमाचे मार्गदर्शन कॉलेजचे प्राचार्य शिक्षक रुंद आणि स्वयंसेवकांनी केले . विद्यार्थ्यांनी या अनुभवातून सेवा हाच धर्म ही भावना प्रत्यक्ष कृतीत उतरवली
या दिव्य सेवा प्रकल्पामुळे समाजात दुर्लक्षित झालेल्या घटकांबद्दल जागृती निर्माण झाली असून प्रकल्पामुळे अनेक मनोरुग्ण माता बांधवांचे त्यांच्या घरी पूर्णपणे बरे होऊन पुनर्वसन करण्यात येते या प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक काकडे यांनी कशाप्रकारे मनोरुग्णांची दिनचर्या आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाद्वारे सांगितले . यावेळी ही भेट आयोजित करण्याकरिता स्किल पॅरामेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉक्टर सचिन सुपे प्राचार्य सौ चैताली पाटील तसेच प्रा. प्रतिभा जाधव, प्रा. प्रज्ञा हिवाळे, प्रा. शुभम सुरडकर यांनी परिश्रम घेतले तसेच यापुढे सर्व विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या समाजसेवी संस्थांना मदत करण्याचे आवाहन कॉलेजच्या प्राचार्य सौ चैताली पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.
