आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न
मेहकर(रामेश्वर तोंडे)
12 ऑक्टोबर 25 मेहकर
दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोज रविवारला राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद,राष्ट्रीय आदिवासी कर्मचारी संघ,राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ यांचे संयुक्त १२वे राज्य अधिवेशन कृषी वैभव लॉन्स मंगल कार्यालय मेहकर जि बुलडाणा
(डोणगांव रोड मॅगो रेसिडेन्सी जवळ) संपन्न झाले. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला
विशेष अतिथी तथा मार्गदर्शक मा वामन मेश्राम साहेब (राष्ट्रीय संरक्षक राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद)हे होते तर
अध्यक्षता मा. विर सिंग राणा (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परीषद) यांनी केली अधिवेशनाच्या उद्घाटक मा.ॲड सुकन्या सुकनंदन हांडे (उच्च न्यायालय,संभाजी नगर) ह्या होत्या. या परिषदेला राष्ट्रीय तथा राज्य स्तरावरील अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
परिषद ‘ न भूतो न भविष्यति’ अशी झाली. सोयाबीनचा हंगाम असतांनाही बहुसंख्येने समाजबांधव हजर होते.याप्रसंगी क्रांतिवीर डोमाजी आंध आदिवासी संस्कृती दर्शन कलापथक वाई, ता. कळमनुरी,जि,हिंगोली येथील पथकांनी पारंपारिक वेशभूषेत विविध आकर्षक कला सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. परिषदेत दोन सत्रांमध्ये महत्वाच्या अशा ८ विषयांवर विचारमंथन झाले.
