श्री संभाजी राजे विद्यालय इसरुळ चे खेळाडू विविध स्पर्धेत जिल्हा विभागस्तर व राज्यस्तरावर
चिखली ( निलेश कोल्हे)क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत श्री संभाजी राजे विद्यालय इसरुळ, च्या खेळाडूनी चमकदार कामगिरी करत विविध स्पर्धेत आपली पात्रता सिद्ध केली आहे यामध्ये कुस्ती खेळात चेतन भुतेकर, अभिषेक भालेराव, चेतन साळवे, प्रज्वल खरात यांनी विविध वजन गटातून तालुकास्तरावर विजय मिळवत जिल्हास्तरापर्यंत मजल गाठली आहे. डॉजबॉल खेळात मुलींचा १९ वर्षातील संघामध्ये जिल्हास्तरावर उपविजे ठरला आहे या मुलींच्या संघात कु. राणी भुतेकर, कु. प्रिया पुंगळे, कु. पायल भुतेकर, कु. पूनम कोलते, कु. ऋतुजा बकाल, कु. कल्याणी चाळगे, कु. अक्षरा भुतेकर, कु. दिव्या बकाल, कु.भक्ती कत्ते, कु. लक्ष्मी नाडे तर कर्णधार कु.पल्लवी भुतेकर यांचा या संघामध्ये समावेश होता.
डॉजबॉल संघात मुलांचा १९ वर्षे आतील संघ जिल्हास्तरावर तृतीय विजय ठरला आहे या संघात बाळू बकाल, सय्यद फरहान, गणेश पाटील (कर्णधार), गणेश बकाल, लावण्य भुतेकर, गौरव भुतेकर, प्रेम नाडे, शेख मुजाम्मीन, भागवत गावंडे, रोहन वैद्य, रविकांत नाडे यांचा संघात समावेश होता.
तलवारबाजी खेळात १९ वर्षे आतील मुलींमध्ये चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावरती निवड झाली आहे यामध्ये कु. पूनम प्रताप भुतेकर,कु पूनम हनुमान कोलते तर विभाग स्तरापर्यंत कु. दिव्या माधव बकाल सहभागी झाली. तलवारबाजी खेळत भुतेकर व कोलते या अमरावती विभागाचा प्रतिनिधित्व करणार आहेत. खेळाडूच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक सचिव शेषराव सावळे व विश्वस्त मंडळ समाधान व्यक्त करून खेळाडूं व क्रीडा शिक्षक नितीन जेऊघाले सर सर्वाचे अभिनंदन करुन पुढील शालेय राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच इसरुळ सरपंच सतीश पाटील भुतेकर व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी शाळेचे मुख्याध्यापक पंढरीनाथ राठोड सहाय्यक शिक्षक योगेश परिहार सर कुमारी उज्वला गवई मॅडम व कर्मचारी गजानन गाडेकर यांनी खेळाडू व क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन करून राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या आहेत.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय क्रीडाशिक्षक नितीन जेऊघाले सर यांना दिले आहे.
