पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढणार सौ कीर्ती मिलिंद डोंगरदिवे
चिखली( एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक सर्कल आणि दोन्ही पंचायत समिती गणाच्या जागा अनुसूचित महिलांसाठी राखीव निघाल्याने अनेकांनी स्वतः ऐवजी पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचे मेरा बुद्रुक सर्कलमध्ये अनेकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दाखवली असून अनेक तरुण उमेदवार या सर्कलमध्ये मतदारांना पहावयास मिळणार आहे.यामध्ये मेरा बुद्रुक येथील मिलिंद नामदेव डोंगरदिवे यांच्या पत्नी सौ कीर्ती मिलिंद डोंगरदिवे या जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी दैनिक दिव्य मातृछायाच्या प्रतिनिधीला माहिती दिली. सौ कीर्ती मिलिंद डोंगरदिवे ह्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या असून त्यांचे सासरे स्वर्गीय माजी सैनिक सुभेदार नामदेव केरोजी डोंगरदिवे यांनी पंचशील कृषी केंद्रामार्फत सर्वसामान्य व्यक्ती सोबत जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी जोपासले होते त्यांचाच वारसा त्यांचा मुलगा मिलिंद डोंगरदिवे यांनी पुढे चालू ठेवल्याने तसेच सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असणारे व भाई मिलिंद अँक्वा याच्यामुळे सर्वांसोबत संपर्कात असणारे मिलिंद डोंगरदिवे यांचा संपर्काचा फायदा सौ.कीर्ती ताईना होणार असल्याचे सध्यातरी बोलल्या जात आहे.
