जुना वाद मिटवण्यासाठी आले आणि वाद वाढवून बसले

chikhalipolicestation_201906254316 (1)

चिखली( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ येथील 12 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेची हकीगत अशा प्रकारे आहे की फिर्यादी तिच्या माहेरी शेळगाव आटोळ येथे आई-वडिलांच्या भेटीसाठी आले व नातेवाईक सोबत झालेलं जुना वाद मिटवण्यासाठी जुनावाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेमध्येच आरोपी यांनी डोक्यात काठी मारून जखमी केले फिर्यादीच्या आईला लोखंडी रोड ने मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीचा भाऊ याला सुद्धा चापट बुक्क्यांनी मारहाण करून शिवगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार मनीषा कपिल भांबळे वय वर्ष 32 रा कृष्णा नगर चिखली यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरून आरोपी आकाश दिलीप जाधव प्रवीण दिलीप जाधव दिलीप संपत जाधव प्रमिला दिलीप जाधव सर्व राहणार शेळगाव आटोळ यांच्याविरुद्ध कलम ११८ (१) 115 (2 )3५१(2) 352 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश देढे करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!