प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 200 हून अधिक शेतकरी आज करणार जलसमाधी आंदोलन….


सिंदखेड राजा ( बुलढाणा माझा न्युज ):सरकार आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा कळस गाठला आहे! गेल्या अनेक दिवसांपासून तहसीलदार कार्यालय तसेच उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) सिंदखेड राजा यांना निवेदन दिले असतानाही कोणताही ठोस निर्णय झाला नाही. दोन्ही कार्यालयांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी योद्धा कृती समितीचे प्रमुख बालाजी सोसे यांनी केला आहे.
या दुर्लक्षामुळे आता शेतकऱ्यांचा संयम पूर्णपणे संपला असून 19 ऑक्टोबर रोजी तब्बल 200 हून अधिक शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
शेतकरी योद्धा कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. तहसीलदार साहेब दिवाळीच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती मिळाली असली, तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील दिवाळी मात्र काळोखात बुडाली आहे.
प्रशासन गोडवा खायला गावाकडे निघालं, पण शेतकऱ्यांच्या अंधाऱ्या दिवाळीकडे कुणाचं लक्ष नाही — असा सवाल समितीने उपस्थित केला आहे.
आता प्रश्न असा आहे की —
👉 शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार का?
की
👉 शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार?
सरकार आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर हे आंदोलन मोठ्या स्वरूपात पेट घेईल, असा इशारा शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा जिल्हा यांनी दिला आहे.
