वर्दडी बु येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर

Screenshot_2025-10-18-20-58-05-07_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) येथे श्री गणपती नेत्रालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वर्दडी बु. येथे पार पडणार आहे.या शिबीरात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अत्याधुनिक मशिनद्वारे डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून लाभार्थ्यांसाठी खालील सुविधा उपलब्ध राहणार आहेत ऑनलाईन AAY (पिवळे) रेशनकार्डधारकांना पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया
PHH (केशरी) रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचार सुविधा जेष्ठ नागरिकांना प्राधान्य चष्मा सवलतीच्या दरात उपलब्ध आवश्यक कागदपत्रे: आधारकार्ड, ऑनलाईन रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, मोबाईल क्रमांक इ.या शिबिरासाठी विशेष सहकार्य श्री गणपती नेत्रालय जालना व समस्त गावकरी मंडळी यांच्याकडून मिळत असून आयोजक संदिप उर्फ छोटुभाऊ पवार मित्र मंडळीऊपसथीत होते

You may have missed

error: Content is protected !!