भरदिवसा घरफोडी करणाऱ्या महिलेला वर्ध्यातून केली अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मलकापूर येथील गुन्ह्याची यशस्वी उकल, रोख रक्कम व सोने असा 6,81,000/-रु.चा मुद्देमाल जप्त….


मलकापूर( बुलढाणा माझा न्युज )जिल्ह्यात दाखल असलेल्या घरफोडी व चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेवून, सदर गुन्ह्यांचा सखोल व बारकाईने तपास करुन, गुन्ह्यांची उकल करुन आरोपीचा शोध घेवून गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा.श्री. निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते. सदर अनुषंगाने पोनि. श्री. सुनिल अंबुलकर स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना जिल्ह्यातील पो.स्टे. मलकापूर शहर येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन, गुन्ह्याची उकल,व मुद्देमाल हस्तगत करणेबाबत सूचना केल्या होत्या पो.स्टे. मलकापूर शहर हद्दीत झालेली घरफोडीच्या गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आलो असून दि.10/10/20255 रोजी फिर्यादी श्री. रविकुमार शिवाजी राठोड रा. गांधारी ता. लोणार ह.मु. चैतन्यबाडी, मलकापुर यांनी पो.स्टे. मलकापूर शहर येथे तक्रार दिली की, दि.10/10/2025 चे दुपारचे सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांचे घरामध्ये प्रवेश करुन, कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याची चैन, पोथ, अंगठी, गोफ, गहूमणी, अंगठी, ब्रासलेट, एक मोबाईल व नगदी 1,75,000/-रु. असा एकूण 6,55,683/-रु.चा मुद्देमाल चोरुन नेला आहे. अशा तक्रारीवरुन पो.स्टे. मलकापूर शहर येथे अप.क्र. 636/2025 कलम 331(1), 305 (क) भा.न्या.सं. प्रमाणे नोंद आहे. स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्ह्याचा बुलढाणा समांतर तपास करुन यशस्वी केली. गुन्ह्यामध्ये 01 महिला आरोपी निष्पन्न करुन, तिला अटक केली आहे. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी 1) सिमा परवीन नसीम शेख वय 45 वर्षे, रा. हैदरपुरा, पो.स्टे. खोलापूरी गेट- अमरावती (दि. 18/10/2025) या महिलेच्या ताब्यातून हस्तगत मुद्देमाल 1) सोन्याची चैन, अंगठ्या-03, ब्रेसलेट-01, कानातील लटकन-02
2) नगदी रोख- 1,75,000/-रुपये एकूण किं. 6,81,000/-रुपयांचा मुद्देमाल.
आरोपी महिलेला वर्ध्यातून पकडण्यात आले महिलेवर विवीध पो.स्टे.ला यापुर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पो.स्टे. मलकापूर शहर करीत आहेत.सदरची कामगिरी मा.श्री. निलेश तांबे पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे आदेशान्वये तर श्री. श्रेणिक लोढा-अपर पोलीस अधीक्षक खामगांव, श्री. अमोल गायकवाड अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात पोउपनि, अविनाश जायभाये, पोहेको, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, गणेश पुरुषोत्तम पाटील, पोकॉ. गजानन गोरले, मपोकों, आशा मोरे-नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पो.हे.कॉ. राजू आडवे तांत्रिक विष्लेषण विभाग बुलढाणा यांचे पथकाने केली.
