अंबादास सखाराम खंड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणार तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
( सतिश जगदाळे, लोणार)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. नाझेर काझी व सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मनोज भाऊ कायंदे यांनी अंबादास सखाराम खंड यांची लोणार तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
या निवडीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अंबादास खंड यांचे पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फुलांचा हार घालून स्वागत केले.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता, अंबादास खंड यांच्यावर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली असून, त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पार्टीच्या कार्यात नवे बळ देण्याचे काम अंबादास खंड यांच्याकडून होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी व आमदार साहेब मनोज भाऊ कायंदे यांनी व्यक्त केला.
