मेरा बु सर्कलमध्ये दुर्गाबाई डोंगरदिवे यांच्या उमेदवारीची जनतेतून जोरदार मागणी

Screenshot_2025-10-24-10-03-13-05_99c04817c0de5652397fc8b56c3b3817


चिखली एकनाथ माळेकर

चिखली तालुक्यातील मेरा बु सर्कल परिसरात सध्या राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मेरा बु जिल्हा परिषद सर्कल महिला एस सी राखीव असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे आगामी निवडणुकीच्या जिल्हा परिषद सदस्य साठी सौ दुर्गाबाई दिनकर डोंगरदिवे यांचे नाव चर्चेत आहे सतत वीस वर्षांपासून राजकारणामध्ये सक्रिय आहे तसेच ते मेरा बु सारख्या गावचे विद्यमान उपसरपंच आहे यापूर्वी सौ दुर्गाबाई दिनकर डोंगरदिवे यांनी जिल्हा परिषद मध्ये पाच वर्ष काम सुद्धा केले आहे त्यांना जिल्हा परिषदचा चांगला अनुभव आहे तसेच दिनकर दौलत डोंगरदिवे यांनी आपल्या आयुष्य देश सेवेसाठी घातले आहे त्यामुळे त्यांना जनतेतून भरपूर पाठिंबा मिळत आहे मेरा बु वासायांनी सौ दुर्गाबाई दिनकर डोंगरदिवे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी जनतेची जोरदार मागणी होत आहे.

स्थानिकांमध्ये या उमेदवारीबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळत असून, दिनकर डोंगरदिवे यांची जनाभिमुख कार्यशैली आणि समस्यांच्या वेळी लोकांमागे नव्हे तर त्यांच्या पुढे राहून केलेल्या मदतकार्यामुळे दिनकर डोंगरदिवे यांच्या नेतृत्वावर सर्व समाजघटकांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या असोत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी असोत किंवा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्याचे काम असो – दिनकर डोंगरदिवे यांनी वेळोवेळी स्वतः उपस्थित राहून मदतीचा हात पुढे करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे मेरा बु जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व जातीधर्मातील नागरिक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत.

स्थानिक नागरिकांचे एकमत स्पष्ट आहे
“आम्हाला बोलणारे नव्हे, तर कृती करणारे नेतृत्व हवे! आणि सौ दुर्गाबाई दिनकर डोंगरदिवे व दिनकर डोंगरदिवे यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.”

सौ दुर्गाबाई दिनकर डोंगरदिवे निवडणूक लढवल्यास मेरा बु जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकास, पारदर्शकता आणि जनसेवेचा नवा अध्याय सुरू होईल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.दिनकर डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली उभी असलेली कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि भक्कम जनसंपर्क हे या सर्कलचे मुख्य बलस्थान ठरत असल्याचेही बैठकीतून समोर आले आहे.
सौ दुर्गाबाई दिनकर डोंगरदिवे मेरा बु जिल्हा परिषद सर्कलमध्ये नव्या ऊर्जेचा, आशावादाचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा पाया रचला जाईल, अशी लोकांची ठाम अपेक्षा आहे.

You may have missed

error: Content is protected !!