महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

rain-2

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह असतानाच अचानक हवामानात बदल झाला. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील स्थितीमुळे पुढील काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज दि २४ ऑक्टोबर रोजी राज्यातील २६ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात काही दिवसांपूर्वी वातावरणात ऑक्टोबर हीटचा जाणवत होता. दुपारच्या वेळेस उकाडा तर रात्रीच्या वेळी हलका गारवा अनुभवता येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून राज्यातील हवामानात बदल झाला. बुलढाण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मागच्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यातच किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट?
हवामान खात्यानं आज मुंबई शहर,मुंबई उपनगर , ठाणे,रायगड, पालघर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक ,अहिल्यानगर , पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड,परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस महत्त्वाचे असून पावसाची उघडीप सुरु राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!