वर्दडी सर्कलमध्ये सावित्राताई पवार यांच्या उमेदवारीची जनतेतून जोरदार मागणी

IMG-20251023-WA0015

सिंदखेड राजा ,प्रतिनिधी ( अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील वर्दडी सर्कल परिसरात सध्या राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) चे लोकप्रिय युवा नेते संदीप उर्फ छोटू पवार यांच्या मातोश्री सावित्राताई राम पवार यांनी निवडणूक रिंगणात उतरावे अशी जनतेची जोरदार मागणी होत आहे.

स्थानिकांमध्ये या उमेदवारीबाबत विशेष उत्सुकता पाहायला मिळत असून, छोटू पवार यांची जनाभिमुख कार्यशैली आणि समस्यांच्या वेळी लोकांमागे नव्हे तर त्यांच्या पुढे राहून केलेल्या मदतकार्यामुळे पवार कुटुंबातील नेतृत्वावर सर्व समाजघटकांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या असोत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी असोत किंवा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्याचे काम असो – छोटू पवार यांनी वेळोवेळी स्वतः उपस्थित राहून मदतीचा हात पुढे करून लोकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे वर्दडी सर्कलमधील सर्व जातीधर्मातील नागरिक त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत.

स्थानिक नागरिकांचे एकमत स्पष्ट आहे —
“आम्हाला बोलणारे नव्हे, तर कृती करणारे नेतृत्व हवे! आणि पवार कुटुंबाने ते प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.”

सावित्राताई निवडणूक लढवल्यास वर्दडी सर्कलमध्ये विकास, पारदर्शकता आणि जनसेवेचा नवा अध्याय सुरू होईल, असा ठाम विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. छोटू पवार यांच्या नेतृत्वाखाली उभी असलेली युवा कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि भक्कम जनसंपर्क हे या सर्कलचे मुख्य बलस्थान ठरत असल्याचेही बैठकीतून समोर आले आहे.

सावित्राताईंच्या उमेदवारीमुळे वर्दडी सर्कलमध्ये नव्या ऊर्जेचा, आशावादाचा आणि विकासाभिमुख राजकारणाचा पाया रचला जाईल, अशी लोकांची ठाम अपेक्षा आहे.

You may have missed

error: Content is protected !!