बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा — पिक विम्याचे २१२ कोटींचे वाटप सुरू,शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व आंदोलनामुळे वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा व्हायला सुरुवात…..

IMG-20251025-WA0019

बुलढाणा निलेश कोल्हे

बुलढाणा – प्रधानमंत्री पिक विमा योजना (खरीप हंगाम २०२४-२५) अंतर्गत विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. एकूण ₹६२८ कोटी ८० लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, यापैकी ₹३३३ कोटी ५४ लाख ८३ हजार ९२५ रुपयांचे वाटप यापूर्वीच झाले आहे. आता अतिरिक्त ₹२१२ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिक विम्यापासून पूर्वी वंचित राहिले होते. विमा हप्ता भरूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप होता. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पिक विमा कपनीच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधुन सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळवून दिला तुपकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून, शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीच्या दाव्यानुसार योग्य भरपाई मिळावी यासाठी मागणी लावून धरली त्यांनी वारंवार प्रशासन आणि विमा कंपनीला मागणी करून, बैठका घेऊन आणि आंदोलनांद्वारे हा प्रश्न लावून धरला अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होऊ लागली आहे.या टप्प्यात बुलढाणा जिल्ह्यातील ६४,९४५ शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२४-२५ साठी ₹१२१ कोटी रुपयांची अतिरिक्त मदत मंजूर झाली असून, ती हळूहळू सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.या संदर्भात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की,हा विजय शेतकऱ्यांच्या संघर्षाचा आहे. पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आहे, कंपन्यांसाठी नाही — हे आम्ही आंदोलनातून दाखवून दिलं. अनेक शेतकरी अन्यायाने वंचित राहिले होते; त्यांच्या खात्यात आता योग्य नुकसानभरपाई पोहोचते आहे, हीच खरी लोकशाही आहे.रविकांत तुपकर यांनी आवाज उठवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्र केले. त्यांच्या नेतृत्वाखालील विविध आंदोलनामुळे शासन व विमा कंपनीवर दबाव निर्माण झाला आणि शेवटी पिक विम्याच्या निधीचे वितरण वेगाने सुरू करण्यात आले.

या वाटपामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी तुपकर यांचे आभार मानत सांगितले की, त्यांच्या संघर्षामुळेच शासनाला पिक विमा वितरण प्रक्रिया गतीमान करावी लागली.

You may have missed

error: Content is protected !!