सावरगाव डुकरे जि.प. हायस्कूल 2008 दहावी बॅचचे गेट-टुगेदर संपन्न,17 वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा

IMG-20251025-WA0024

चिखली (अजहर शेख) सावरगाव डुकरे( चिखली) शिक्षणाच्या बाबतीत नावलौकिक असलेली जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव डुकरे येथील 2008 दहावी च्या वर्गाच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनी दिनांक 25 ऑक्टोंबर वार शनिवार रोजी मोठ्या उत्साहात आनंदात गेट टुगेदर साजरे केले, वास्तविक पाहता दहावीनंतर एकत्र येणे व आपापले सुखदुःख आपल्या बाल मित्रांना सांगणे यात खूप आनंद आहे यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून LR वायाळ सर, SG घुगे सर, SS म्हस्के सर, RM चिंचोले सर, VJ गायकवाड सर, सोलंकी सर ज्या सर्व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आणि योगायोगा ने म्हस्के सरांचा वाढदिवस आजच होता त्यामुळे सर्वांनी सरांना शुभेच्छा दिल्या,
त्यावेळच्या दहावी वर्गातील विद्यार्थी गणेश पाटील यांच्या संकल्पनेतून एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला यामध्ये दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम केले. जसे जसे व्हाट्सअप ग्रुप मध्ये संख्या वाढू लागली. सुखा दुखाच्या गोष्टी यामध्ये होऊ लागल्या एक एक करता करता जवळपास सर्वजण या ग्रुप मध्ये आले गेट-टुगेदर करण्याचे ठरवले शाळेचा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या नव्या जुन्या आठवणींना उजाळा देत पहिले गेट-टुगेदर जि प हायस्कूल सावरगाव डुकरे येथे विविध ठिकाणाहून आलेले वर्गमित्र एकत्र जमले यामध्ये प्राध्यापक, बँकिंग क्षेत्र, फायनान्स, विविध क्षेत्रात अधिकारी, कृषी क्षेत्रात, आरोग्य विभाग, कनिष्ठ लिपिक, सरकारी ठेकेदार, शेती, मीस्त्री, कुणी पत्रकार असे अनेक हुद्यावर असणारे
मित्र, व्यवसायिक, शिक्षक हे सर्व स्वतःला विसरून फक्त आपण विद्यार्थी आहोत असे या गेट टुगेदर कडे पाहत होते सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन अमोल इंगळे यांनी केले व सर्वांनी सोबत जेवणाचा आनंद घेतला व सर्वजण एकमेकांच्या जुन्या आठवणी सोबत घालवलेले क्षण सांगत होते या वेळस धनंजय डुकरे, गणेश पाटील ,अमोल म्हस्के, सतीश पैठणे, अमोल इंगळे,भरत डुकरे, अविनाश साळवे, भागवत ठेंग,
ज्ञानेश्वर ठेंग, गोविंदा बिथरे,
प्रवीण गवळी, नितीन खंडागळे,
स्वप्नील जाधव, विकी जाधव,
रवी डुकरे, गजानन डुकरे,
शुभांगी पाटील, दीपाली पाटील,
शारदा पाटील, अस्मिता भिसे,
प्रतिभा साळवे इत्यादी माजी विद्यार्थी हजर होते या गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वी करण्यास गणेश पाटील, धनंजय डुकरे, अमोल म्हस्के ,यांच्या अथक परिश्रमातून यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली, सर्व मित्र मैत्रिणीच्या सहकार्यान व पुढच्या वर्षी जास्तीत जास्त संख्येने हजर राहू व वर्षातील एक दिवस सोबत राहू हा निश्चय घेऊन हे गेट टुगेदर अतिशय उस्हात व खेळीमेळ्याच्या वातावरणात पार पडले.

You may have missed

error: Content is protected !!