केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीअतिसार ग्रस्त पिंप्री माळेगाव गावाला दिली भेट … ग्रामस्थांशी साधला संवाद .. ग्रामस्थाना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे संबंधीत यंत्रनेला दिले निर्देश …

IMG-20251026-WA0010

बुलडाणा ( बुलढाणा माझा न्युज ) अतिसाराची लागण झालेल्या बुलडणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिप्री माळेगांव गावाला काल 25 ऑक्टोंबर रोजी केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली . गावकऱ्यांची संवाद साधला .. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिकांना अतिसार ची लागण झाल्याचे लक्षात येतात गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिलेत

बुलढाणा जिल्ह्याचे शेवटचं टोक असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील पिप्री माळेंगाव ( अडगांव ) येथे दुषित पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे गावातील नागरिकांना पोटदुखी आणि अतिसारामुळे गावकरी त्रस्त झाला होता . सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला वाण धरणातून १४० गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होत आहे. १४० गाव योजनेतून गावातील सार्वजनिक विहिरीत येणाऱ्या पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे घाण पाणी त्यात मिसळत आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रत्यक्ष गावात जावून गावकर्यासोबत संवाद साधला अधिकाऱ्या सोबत आढावा घेतला व गावाला तात्काळ स्वच्छ पाण्याच्या पुरवठा व्हावा यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. १४० गाव योजनेतील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे लिकेज व इतर दुरुस्तीचे काम त्वरित करून पाणी हे टाकी सोडून ते ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून तात्काळ काम करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले . गावातील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात शुद्ध पाणी देण्यासाठी दोन सिंटेक्सच्या टाक्या बसून पाणी देण्याचे निर्देश संग्रामपूरच्या गट विकास अधिकारी यांना दिलेत गावच्या हनुमान मंदिरामध्ये ग्रामस्थांशी संवाद साधला त्यानंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीवर जाऊन तिची पाहणी केली ..यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री.शांताराम दाणे,
शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संतोषराव डिवरे,उपविभागीय अधिकारी श्री.काळे साहेब,तहसीलदार श्री.प्रंशात पाटील, आरोग्य अधिकारी श्री.मारोडे साहेब,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.राजु पाटील ठाकरे,युवासेना लोकसभा अध्यक्ष श्री.चेतन पाटील
तालुका प्रमुख श्री.केशव ढोकणे,शहरप्रमुख श्री.संतोष लिप्ते शिवसेना,युवासेना,महिला आघाडी व महायुतीचे आजी-माजी प्रमुख पदाधिकारी तथा आरोग्य विभाग व महसूल,ग्रामविकास विभागाचे अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!