रामनगर येथे वीज पडून एक बैल ठार शेतकऱ्याची आर्थिक हाणी शासनाने मदत देण्याची गरज.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे रामनगर येथील देवदास हिम्मतराव भगत गट नंबर 27 यांनी आपल्या शेतामध्ये आपलं बैल बांधले असता निसर्गाच्या आव कृपेमुळे बैलाच्या अंगावर वीज पडून दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी अवकाळी पावसाच्या विजेच्या कडकडे मध्ये बैलाच्या अंगावर वीज पडून बैल जागीच ठार झाला आहे देविदास भगत हे गट नंबर 27 मध्ये शेतीची मशागत करत असतानाच निसर्गाच्या पावसाला सुरुवात झाली आणि त्यामध्ये विजेचा कडकडाट होऊन शेतामध्ये बांधलेला बैल हा वीज पडून जागीच ठार झाला आहे शेतकऱ्याचे आर्थिक आणि मानसिक सुद्धा नुकसान झाले आहे आज पेरणीला सुरुवात करण्यासाठी शेतीची मशागत करत असतानाच निसर्गाच्या आव कृपेमुळे मुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे आज शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटाची लढत असतानाच निसर्गाच्या प्रकोप सुद्धा शेतकऱ्यावरच झाला आहे देविदास भगत हे एक अल्पभूधारक शेतकरी असून त्यांचा शेतीवरच उपजीविका चालत आहे त्यातच विजेमुळे बैल वारल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले आहे त्यामुळे शासनाने त्यांना निसर्गाच्या आव कृपेमुळे झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई द्यावी असे मागणी शासनाकडे केली आहे आशी माहिती आमचे प्रतिनिधीशी बोलताना देविदास भगत यांनी सांगितले आहे
