ओळखलं का मला प्रत्येकांच्या ओठी , तब्बल 21 वर्षानंतर स्नेह संमेलनाच्या निमित्ताने झाल्या मित्रांच्या गाठीभेटी

IMG-20251026-WA0022

बुलढाणा (सचिन खंडारे) मैत्री या शब्दांमध्ये सर्वकाही सुख आणि दुःख सामावलेलं आहे ,मैत्रीची व्याख्या हे महाभारतापासून आपण बघत आलेलो आहे कृष्ण आणि सुदामाची मैत्री ही जगविख्यात आहे, आणि हीच मैत्री प्रत्येकाला जगण्याचं बळ देत असते ,
आपण प्राथमिक शिक्षण घेत असताना आपल्याला खऱ्या अर्थाने मैत्री म्हणजे काय हे त्यावेळेला कळत नसतं ,कारण आपण लहान असतो ज्या वेळेला आपण आठवी किंवा दहावीला असतो त्या वेळेला खऱ्या अर्थाने मैत्रीची व्याख्या आपल्या हळूहळू लक्षात येत
असते,कॉलेजमध्ये असताना तर विचारूच नका,आणि हीच मैत्री कायम राहावी म्हणून दिवाळीच्या सुट्ट्या मध्ये अनेक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असते ‘
साखरखेर्डा येथे सुद्धा दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये असाच आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, निमित्त होतं २००२ दहावी मध्ये सोबत शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘ यामध्ये श्री शिवाजी हायस्कूल व जिजामाता विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी ‘ त्याचबरोबर 2004 चार मध्ये एस एस कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अकरावी आणि बारावी मध्ये विविध शाखेमध्ये सोबत शिक्षण घेणारे विद्यार्थी,तब्बल 21 वर्षानंतर मुल आणि मुले स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते ‘
असं म्हटल्या जातं,

मैत्री शिवाय पर्याय नाही याची मला जाण आहे
मैत्री शिवाय जीवन हे एक
तुटलेलं पान आहे

मैत्री शिवाय कुठलीही व्याख्या होऊ शकत नाही म्हणून सर्वच मित्र की जे तब्बल 21 वर्ष एकमेकाच्या सव्वाशे मध्ये नव्हते कुणी डॉक्टर झालेले कुणी ग्रामसेवक झालेले कोणी शिक्षक झालेले कुणी महसूल अधिकारी झालेले तर कोणी शेतकरी तर कोणी उद्योजक असे सर्वच मित्र मित्रांच्या गाठीभेटी घेण्याकरता इच्छुक होते,

कारण असं म्हटलं जातं

हर वक्त मंजिल की कडी होती है,
हर मुलाखत मोहब्बत की घडी होती है,

वक्त मिले तो रिश्तो के किताबे पडना,

दोस्ती खून के रिश्तो से भी बडी होती है,

.. आणि हीच मैत्रीचं नातं जोपासण्यासाठी सर्वजण आशीर्वाद मंगल कार्यालयावर जमले होते सर्वांना फेटा बांधण्यात आला ,

सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले,गाठीभेटी होताना ओळखलं का मला हा शब्द प्रत्येक मित्रांच्या आणि मैत्रिणींच्या तोंडी होता,याला कारण आहे तब्बल 21 वर्षे होते,
वर्गामध्ये शिकत असताना कोणी शिक्षकांचा मार खाल्ला कोणी नाही खाल्ला कोणी पास झाला कोणी नापास झालं यापेक्षाही प्रत्येक जण एकमेकाची आस्थेने विचारपूस करत होता

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य अगदी ओसंडून वाहत होतं

प्रत्येक जण आपलं दुःख विसरून आपल्या मित्राला भेटण्यासाठी आतुर असल्याची जाणीव होत होती ‘

मैत्री म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी दोस्तीची वाट
मैत्री म्हणजे हवेतला उबदार गारवा
अन जणू दरवळणारा मारवा
मैत्री म्हणजे अत्तराची इवलीशी कुपी
दुःखावरची हळुवार जादूची झप्पी,,

स्वागत संपल्यानंतर पेशाने पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर असलेले पवन बेंदाडे यांनी अतिशय सुंदर आवाजामध्ये गीत सादर केले
व खऱ्या अर्थाने कार्यक्रमाच्या स्नेहसंमेलनामध्ये रंगत भरली ‘
यावेळी एस एस कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिस्तबद्ध शिक्षक असलेले संतोष दसरे ‘राऊत सर माजी मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल ‘ जिजामाता विद्यालयाचे अशोक गवई सर ‘
शिवाजी हायस्कूलचे कुले सर ‘तेजराव खरात सर ,नेहरू विद्यालय येथील शिक्षक आटोळे सर या सर्वांचे स्वागत होऊन त्यांनी आपले विचार व्यक्त केले ‘

काहींनी आपले अनुभव त्या ठिकाणी मांडले ‘असाच स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छाही व्यक्त केली कारण ‘मित्र म्हणजे एक झाड वळणांवर वाढणारं आपली सावली होण्यासाठी कोणासोबत लढणार

भाषण संपल्यानंतर सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी उत्तम आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती ‘ भोजन संपल्यानंतर सर्वांनी एकत्रित रित्या फोटोही काढला प्रत्येकाने मी इथे आहे आले तर नक्की जोडीने या अशी साथ सुद्धा काही मुलींनी घातली
आणि हेच जीवनामध्ये एकमेकाचे सुख आणि दुख विचारपूस करण्याची हिंमत फक्त मैत्रीमध्येच आहे हे यातून सिद्ध होते ,
कुणालाही पैसा नको आहे कुणालाही तुमचं काही नको आहे फक्त दोन शब्द प्रेमाचे दोन शब्द आपुलकीचे तुमच्या जीवनामध्ये आकार देऊ शकतात हेच स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून गाठीभेटीच्या निमित्ताने दिसले आहे ‘

सदर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन ज्यांनी खऱ्या अर्थाने ही संकल्पना डोक्यात आणली असे निलेश पौंधे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजू काटे यांनी केले ‘
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले .

You may have missed

error: Content is protected !!