डोंगर खंडाळ्याची मान लोणावळ्यातः ग्राम विकासाचे शिल्पकार श्याम सावळे (पाटील) सन्मानित !विकासाची दखल घेत “महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने” झाला गौरवः ग्रामस्थांकडून जल्लोष
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा तालुक्यातील कार्यक्षम व प्रतिभावंत सरपंच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगर खंडाळा ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच श्याम बळीराम सावळे यांना नुकताच लोणावळा येथे पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने ‘ग्रामरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.गावात राबवलेल्या विकासकामांची दखल घेऊन पंचायत राज विकास मंचाच्यावतीने बुलढाणा तालुक्यातील डोंगर खंडाळा येथील प्रभारी सरपंच श्याम सावळे यांना महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे २६ ऑक्टोबर रोजी हा गौरव सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या पुरस्काराने डोंगर खंडाळा गावाची मान उंचावली असून ग्रामस्थांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषद संलग्नित पंचायत राज विकास मंचचा रविवारी २६ ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे ग्रामरत्न सरपंच पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटे, यशदाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी (IAS) यांची प्रमुख उपस्थिती होती. विकासकामांच्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा बदलणाऱ्या कल्पक सरपंच नेतृत्वाचा सन्मान करण्यात आला. डोंगर खंडाळा येथील प्रभारी सरपंच श्याम सावळे यांनी अल्पावधीत गावात अनेक विकासकामे मार्गी लावली. त्यांनी केलेल्या कामाची पावती ग्रामरत्न सरपंच पुरस्काराच्यारुपाने मिळाल्याच्या भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहेत.
ग्रामस्थांना पुरस्कार समर्पित :
हा पुरस्कार डोंगर खंडाळा ग्रामपंचायतीतील प्रत्येक ग्रामस्थांला समर्पित असून डोंगर खंडाळा ग्रामस्थांचे प्रेम, पांठिबा, आशिर्वाद हेच या यशाचे बळ आहे, तसेच नेहमीच पांठिबा देत असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारीवर्ग यांचे मिळत असलेले सहकार्य यांनी दिलेला आधार व पाठबळ याबद्दल आभारी आहे.
प्रभारी सरपंच श्याम सावळे ग्रामपंचायत डोंगर खंडाळा
