गांगलगावातील अवैध देशी दारू बंद होईल का? .उत्पादन शुल्कविभाग साखर झोपेत गांगलगाव येथे दारूचा महापूर उपोषण करते उपोषणावर ठाम .
चिखली( एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील मौजे गांगलगाव येथे अवैध्य दारूचा महापौर असल्याची तक्रार लहुजी शक्ती सेनेचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष मुकेश पंजाबराव खरात गणेश सुभाष खरात गोपाल अजबराव गायकवाड यांनी अंढेरा पोलीस स्टेशन यांना 27ऑक्टोबर 2025 रोजी अंढेरा पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले की अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गांगलगावातील अवैद्य दारु विक्री तात्काळ बंद करावी न झाल्यास 29 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही ग्रामपंचायत कार्यालय भवन गांगलगाव येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत गांगलगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे अवैद्य देशी दारू संपूर्ण गावातील शांतता भंग झाली आहे गावातील रस्त्यावर या अवैध दारूमुळे दारुड्याकडून सतत गोंधळ घातल्या जात असून या प्रकारामुळे संपूर्ण गाव त्रस्त झाले आहे अनेक माया बहिणींना दारुड्या कडून मारहाण होण्याचे प्रमाणही वाढले आहे अनेक बहिणीचे संसार उघड्यावर आले आहेत अनेकांच्या घरातील अन्नधान्य भांडीकुंडी दारुड्याकडून विकली जात असल्यामुळे सदर घरातील बालगोपाल विद्यार्थ्यांचे आगमनावर विपरीत परिणाम होत आहे दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यामुळे गावातील एकमेकांचे सलोख्याचे संबंध बिघडत आहेत गुन्ह्यागोविंदाने राहणारे गावकरी अवैद्य दारू विक्रीमुळे फार कंटाळून गेले आहे चोऱ्यामाऱ्याचे प्रमाणही वाढत आहे लहान मुला बाळाचे भविष्य अवैद्य दारू विक्रीमुळे बिघडण्यास सुरुवात झाली आहे अवैद्य दारु मुळे अनेक बहिणीचे संस्कार उघड्यावर येण्यापासून वाचवण्यासाठी अनेक माय बहिणींना होणारे दररोजची मारहाण थांबवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्यापासून थांबवण्यासाठी व या अशा अनेक बाबतीत गांभीर्यपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे म्हणूनच मौजे गांगलगाव गावातील सर्व क्षेत्रातील मातब्बर दिग्गज प्रतिष्ठित मान्यवराची विचार विनिमय करून हे गाव व्यसनमुक्ती करण्याचा आम्ही निर्धार केला आहे गावाचा व्यसनमुक्तीला सुरुवात आम्ही अवैध्य दारू विक्री पासुन करीत आहोत सदर प्रकार बाबत अंढेरू पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे की आम्ही उपोषण करते यांच्याकडे गांगलगाव येथे गेलो असता आम्हाला त्या गावांमध्ये अवैध दारू मिळवून आली नाही तक्रार करते सुद्धा आमच्या सोबत होते परंतु त्या ठिकाणी आम्हाला मुद्देमाल सापडून आला नाही आणि मी अंढेरा पोलीस स्टेशन येथून दररोज एक पोलीस कर्मचारी गांगलगाव येथे अवैध दारू विक्रेत्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवणार आहे अशी माहिती अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे दूरध्वनीवरून दिली आहे
