नीती आयोग व भारत सरकार तर्फे ‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान’ जाहीर १६ राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेले प्रशांत ढोरे पाटील यांचा आणखी एक मानाचा सन्मान….!

IMG-20251028-WA0020

निलेश कोल्हे

चिखली : नीती आयोग मान्यताप्राप्त आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) अंतर्गत संचालित “जीवन जागृती सेवा संस्थान” तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित “अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान – 2025” हा पुरस्कार बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र व कोटा (राजस्थान) येथे कार्यरत असलेले प्रशांत पुरुषोत्तम ढोरे पाटील यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यात अग्रणी, बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा संघटन सचिव, प्रेरणादायी लेखक, वक्ते, हॅपिनेस कन्सल्टंट आणि सायकोलॉजिकल काउन्सिलर म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत पाटील हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून वंचित व बहुजन शेतकरी बांधवांच्या हक्क-अधिकारांसाठी सातत्याने लढा देत आहेत. याशिवाय, कोटा (राजस्थान) येथे ते JEE आणि NEET परीक्षार्थी हजारो विद्यार्थ्यांना योग्य करिअर मार्गदर्शन आणि कौन्सिलिंगद्वारे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.आतापर्यंत प्रशांत पाटील यांना १६ राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून त्यांच्या कार्याची दखल अनेक प्रतिष्ठित संस्थांनी घेतली आहे. आता या गौरवमयी प्रवासात “नीती आयोग व भारत सरकारच्या MSME मंत्रालयाच्या” अधिपत्याखालील जीवन जागृती सेवा संस्थान कडून देण्यात येणाऱ्या “अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मानाने” आणखी एक तेजस्वी अध्याय जोडला गेला आहे.त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन जीवन जागृती सेवा संस्थान तर्फे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. या उपलब्धीमुळे बुलढाणा जिल्ह्याचा गौरव अधिक उंचावला आहे.
या सन्मानाबद्दल प्रशांत ढोरे पाटील यांना विविध क्षेत्रातून मनःपूर्वक अभिनंदन मिळत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सन्मान जाहीर दिनांक: २७ ऑक्टोबर २०२५
पुरस्कार प्रदाता: जीवन जागृती सेवा संस्थान, नीती आयोग व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, भारत सरकार
“सेवा हीच खरी साधना” — या जीवनमंत्रावर विश्वास ठेवणारे प्रशांत पाटील आजच्या तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.

You may have missed

error: Content is protected !!