दीपावली पाडवा,स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..! हजारोंच्या साक्षीने नव्या युगाचा आरंभ..

Screenshot_2025-10-29-08-52-02-94_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे)किनगावराजा येथे तिरुपती लॉन्स,येथे आयोजित या कार्यक्रमाला बोधीवृक्षाचे पुजन व जल अर्पण करून सुरुवात करण्यात आली. या वेळी विचार पिठावर मा.श्री विनोद भाऊ वाघ भाजपा प्रदेश प्रवक्ते,अशोक नाना,जाधव भिकाजी तळेकर गुरुजी, रमेशजी वगदे,पंढरीनाथ महाराज घुगे,शंकरराव महाराज घुगे,विठ्ठल भाऊ चव्हाण,विनोद ठाकरे सर यांनी मनोगत व्यक्त करून प्रवीणभाऊ गीते यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या,यावेळी विविध क्षेत्रातील प्रवीणभाऊ गीते यांच्यावर प्रेम करणारी मान्यवर मंडळी उपस्थित होती..

सळसळता उत्साह,नव्या विचारांची पेरणी ह्या संगमातून हा अभूतपूर्व कार्यक्रम उपस्थितांना वेगळी उर्जा देऊन गेला..

समाजकारनातला माणूस राजकारणात आला पाहिजे तरच गढूळ झालेलं राजकारण स्थीर होईल..मान्यवरांच्या भाषणातला सूर..

प्रवीणभाऊ गीते ना बळ देण्यासाठी मान्यवरांनी केले उपस्थिताना भावनिक आवाहन.

प्रचंड टाळ्यांच्या गजरात गर्दीने दिले अनुमोदन..

You may have missed

error: Content is protected !!