२४ शेतकऱ्यांची फसवणूक उघड! – फसवणुकीपासून वाचण्यासाठी तरुणाचा विषप्राशनाचा बनाव; पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न फसला….
सिंदखेडराजा( अनिल दराडे ) सिंदखेडराजा तालुक्यातील लिंगा (देवखेड) परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील पवन प्रल्हाद जायभाय या तरुणाने स्वतःचे विष प्राशन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली होती. व्हिडिओमध्ये त्याने “किनगाव राजाचे ठाणेदार आणि इतरांच्या त्रासाला कंटाळलो” असे सांगून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
मात्र, पोलिसांच्या सखोल चौकशीतून या घटनेमागचे खरे सत्य उघड झाले असून, ही आत्महत्येची नाट्यमय घटना पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणि स्वतःवरील फसवणुकीच्या गुन्ह्यापासून सुटका मिळवण्यासाठी रचलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
🔍 घटनेचा तपशील
२५ ऑक्टोबर २०२५ रोजी, पुष्पा प्रल्हाद जायभाये (राहणार लिंगा) यांनी कारभारी सांगळे व इतर दोन जणांविरोधात घरासमोर शिवीगाळ व वाद झाल्याची तक्रार दाखल केली होती. पैशाच्या वादावरून झालेला हा प्रकार असल्याने तो चौकशीवर ठेवण्यात आला.यानंतर २७ ऑक्टोबर २०२५ रोजी, पुष्पा जायभाये यांचा मुलगा पवन प्रल्हाद जायभाये (वय ३२) याने रामेश्वर सांगळे (राहणार जवळका) यांनी त्याची बैलजोडी चोरून नेल्याची तक्रार केली. परंतु चौकशीत सांगळे यांनी सांगितले की प्रल्हाद जायभाये यांनी घेतलेल्या कापसाच्या पैशांच्या बदल्यात ही बैलजोडी तात्पुरती वापरण्यास दिली होती.यानंतर इतर शेतकऱ्यांनीही पोलिसांकडे अर्ज देऊन पवन आणि प्रल्हाद जायभाय या दोघांनी त्यांच्या शेतीचा माल घेऊन पैसे दिले नसल्याची तक्रार केली.
⚠️ दबाव आणण्यासाठी आत्महत्येचा बनाव
पोलिसांनी प्रल्हाद जायभाये यांना समजपत्र देऊन,
“जर आपण चौकशीसाठी आले नाही, तर सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून आपल्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल” असे सांगितल्यानंतर,पवन जायभाये यांनी आपल्या घरात व्हिडिओ क्लिप तयार करून ‘आपल्या मृत्यूस ठाणेदार आणि संबंधित लोक जबाबदार असतील’ असे सांगत कीटकनाशक प्राशन केले.हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बीबी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, आणि नंतर जालना येथील सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ
