दांडी बहाद्दर कर्मचाऱ्याचे अंत्री खेडेकरला लागले ग्रहण. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल देण्याची गरज.
चिखली (एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे अंत्री खेडेकर तालुक्यात नवै जिल्ह्यात अंत्री खेडेकर गावाची ओळख नसेल अशी जिल्ह्यामध्ये गाव नसेल असे दिग्गज नेते अंत्रीखेडेकर मध्ये घडवले परंतु आता अंत्री खेडेकर ला शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रहण लागले आहे अंत्री खेडेकर मधील ग्राम महसूल कर्मचारीअसो ग्रामपंचायतचे कर्मचारी असो पशुवैद्यकीय कर्मचारी असो आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारीअसो हे सर्वच अंत्री खेडेकर येथील जनतेला लागलेले ग्रहण आहे. अंत्री खेडेकर येथील महसूल कर्मचारी विजय खरात हे सतत दांड्या मारतात त्यामुळे अंत्री खेडेकर व आसोला बु येतील लोकांचे हाल होत आहे महसुल अधिकारी विजय खरात यांना अंत्री खेडेकर हे मुख्यालय असताना सुद्धा ते अंत्री खेडेकर येथे राहत नाही सोमवारी मंगळवारी आले नाही आणि बुधवारी आले आणि फक्त दोन लोकांची सातबारे काढून परत गेले त्यांच्यासमोर अंत्री खेडेकर व असोला बु येथील 50 ते 60 शेतकरी असताना सुद्धा त्यांचे सातबारे व न काढताच महसूल अधिकारी विजय खरात हे आपल्या ऑफिस बंद करून येथून परत गेले आहे कधी मथी त्यांचे येण्याची वेळ सुद्धा दहा ते अकरा वाजेची असून ताबडतोब परत जातात येथे गोरगरीब जनतेचे कामे त्यांच्यामुळे आडले आहे विजय खरात हे अंत्रीखेडेकर मुख्यालय असून सुद्धा 30 ते 40 किलोमीटर वरुण येणे जाणे करतात आणि त्यांचा दूरध्वनी सुद्धा सतत बंद असतो आणि दूरध्वनी लागलं असतं मी चिखलेला मिटिंग मध्ये आहे आणि बुलढाण्याला मीटिंगमध्ये आहे असे उडवा उडवीचे उत्तरे देतात ते येत नसल्यामुळे अंत्रीखेडेकर व असोला बु येथील शेतकरी कुटुंबांना आर्थिक भुर्दंड पडत आहेत शेतकरी आज अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढत असताना या महसूल अधिकाऱ्यांशी सुद्धा शेतकऱ्यांना तासनतास बसून आपली रोज मजुरी बुडून सुद्धा अंत्रीखेडेकर येथील ग्राममहसुल अधिकारी विजय खरात लोकांना भेटत नाही लोकांनी लोकांचे त्यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे आता असोला बुद्रुक हे नेमकेच पोखरा सुरू झाले आहे तसेच नाफेडची सोयाबीन खरेदीचा सुद्धा सुरु झाली आहे लोकांना सातबारा लागतात परंतु विजय खरात येथे येत नाही अमोशा पौर्णिमेला उगवणारा चंद्र लोकांना कदाचित भेटतो त्यामुळे अंत्रीखेडेकर व आसोला येथील शेतकरी वर्गाचे हाल होत आहे तसेच सर्वसाधारण शेतकऱ्यांना उडवा उडवीचे उत्तर देतात महसूल अधिकारी विजय खरात यांची तहसिलदार चिखली यांच्या कडे अंत्रीखेडेकर येथील दीडशे शेतकऱ्यांनी चिखली तहसीलदार यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे तसेच आसोला बु येथील शेतकऱ्यांनी सुद्धा विजय खरात यांची तहसीलदारा चिखली यांच्या कडे तक्रार केली आहे परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची क्रिया चिखली तहसीलदार यांनी घेतली नाही त्यामुळे काल दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी उपविभागीय अधिकारी बुलढाणा शरद पाटील यांच्याशी अंत्री खेडेकर येथील लोकांनी संपर्क साधून आम्हाला नवीन तलाठी द्या हे सतत गैरहजर असतात त्यामुळे आमचे मानसिक आणि आर्थिक हाणी होत आहे हे दांडीबहाद्दर विजय खरात आम्हाला नको आमचे गाव जर तलाठी मिळत नसेल तर ॲडिशनल पर्यायी तलाठ्याकडे द्या अशी भूमिका अंत्री खेडेकर येथील व असोला बु येथेल शेतकऱ्यांनी घेतली आहे सदर तलाठी कार्यालय समोर किती वाजता ऑफिस उघडेल आणि किती वाजता बंद होईल याची सुद्धा कोणत्याही प्रकारचे फलक विजय खरात यांनी लावलेले नाही शासनाच्या नियम असताना सुद्धा यांनी आपल्या कार्यालय पुढे कोणतेही प्रकारचे फलक लावलेले नाही किंवा दूरध्वनी क्रमांकाचे व ईमेल आयडी तसेच उघडण्याची वेळ आणि बंद होण्याची वेळ याची सुद्धा माहिती नाही . तसेच अंत्री खेडेकर येथील ग्राम विकास अधिकारी विवेक काळे हे सुद्धा कधी येतात आणि कधी जातात याची कल्पना सुद्धा सर्वसाधारण लोकांना लागत नाही ते सुद्धा सतत गैरहजर असतात त्यांच्याकडे सुद्धा गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी सागर पाटील हे किती वाजता येतात आणि किती वाजता जातात याची पशुपालकांना बनक सुद्धा लागत नाही आणि पशुपालकांनी त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मी या गावाला आहे मी त्या गावाला आहे असे
उडवा उडवीचे उत्तरे देतात त्यांचे सुद्धा वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून चौकशी करून योग्य तो समज द्यावा त्यांच्या कार्यालय समोर कोणत्याही प्रकारचे फलक लावले नाही उघडण्याची वेळ त्यांचा मोबाईल त्यांचा ई-मेल व बंद होण्याची वेळ याची कोणत्याही फलक लावलेले नाही तसेच तेथे असलेले इतर कर्मचारी सुद्धा हे दांडी बहादरच आहे ते सांगतात की नऊ वाजता येतो आणि बारा वाजता जातो हा कोणता वेळ आहे याचे सुद्धा चौकशी करण्यात यावी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्री खेडेकर येथील कर्मचारी सुद्धा कधी येतात आणि कधी जातात याची सुद्धा भनक अंत्रीखेडेकर येथील लोकांना लागत नाही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ येथे कोणताही फलक लावलेला नाही तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की दुसरे काही हे सुद्धा ओळखू येत नाही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही 7/ 24 असताना सुद्धा बोटावर मोजणीतलीच कर्मचारी अंत्री खेडेकर प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये वास्तव्यास असतात या ठिकाणी अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आहे परंतु ते काही तालुक्याच्या ठिकाणाहून तर काही जिल्ह्याच्या ठिकाणी आसतात वआपला कारभार बाहेर गावाहून पाहतात प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये प्रथम उपचारासाठी रूग्ण आला असते ते कोणत्याही प्रकारचे इलाज करण्यात येत नाही त्यांना समोर जाण्याचा सल्ला देण्यात येतो. ग्राम महसूल असो पशुवैद्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी तसेच ग्रामविकास अधिकारी आसो यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समज देण्याची गरज निर्माण झाली आहे न्यायलाच असतो सर्वसाधारण जनता त्यांच्या विरोधात उपोषणास बसल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना वावगे ठरू नये तूर्तास एवढेच बाकी पुढील भागात लवकरच
